मुंबई, ता. १३ : महाराष्ट्रात स्वाईन फ्ल्यू आणि डेंगीच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी आरोग्याबाबत अधिक सतर्क राहावे, असे आवाहन स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनीने केले आहे.
सतत किंवा वाढणारा ताप, तीव्र अंगदुखी, उलट्या, श्वास घेण्यास त्रास किंवा डिहायड्रेशनची लक्षणे यांकडे दुर्लक्ष करू नये. सुरुवातीलाच वैद्यकीय सल्ला घेऊन आवश्यक चाचण्या केल्यास वेळेवर निदान होऊन गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते, असे कंपनीचे मुख्य दावा अधिकारी डॉ. अभिजित घोष यांनी सांगितले. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, २१ ऑगस्टपर्यंत राज्यात स्वाईन फ्ल्यूचे १,१०९ रुग्ण आढळले. ही संख्या मागील वर्षापेक्षा ९४२ने जास्त आहे. तसेच १४ ऑगस्टपर्यंत डेंगीचे ५,५५८ रुग्ण (मागील वर्षी ४,३४४ ) नोंदले आहेत. स्टार हेल्थने दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यात विविध मोसमी संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून इतर आजार असलेल्या व्यक्तींनी स्वतःच निदान किंवा औषधोपचार करण्याऐवजी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छता पाळावी, पिण्याचे पाणी शुद्ध असावे, डासांची पैदास होणार नाही याची काळजी घ्यावी आणि डासांपासून संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे डॉ. अभिजित घोष म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.