मुंबई

शेअर बाजारांवर देखरेखीसाठी एआय

CD

शेअर बाजारांवर देखरेखीसाठी एआय
सेबीच्या अध्यक्षांचे सूतोवाच

मुंबई, ता. १० : शेअर बाजारांच्या व्यवहारांवर देखरेख ठेवण्यासाठी एआयसह आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचे सूतोवाच सेबीचे अध्यक्ष तुहीनकांत पांडे यांनी येथे केले. त्याच वेळी नियमकांची जबाबदारी बाह्य यंत्रणेवर (आउटसोर्स) सोपवता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये त्यांनी हे सांगितले. शेअर बाजारातील धोके व्यवस्थापन यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी एआय वापराबाबत इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ सिक्युरिटी कमिशन सुपरवायझरी टूलकिट वापरण्याबाबत विचार चालू आहे, असेही त्यांनी सांगितले. सेबीला स्वतःची देखरेख व्यवस्था तंत्रज्ञानावर आधारित करावयाची आहे. अर्थात यात केवळ ही व्यवस्था यांत्रिक करण्याचे उद्दिष्ट नाही, तर शेअर बाजारातील जे पॅटर्न परंपरागत पद्धतीने आढळून येत नाहीत, त्या बाबी डेटा, अनालिटिक्स आणि एआयमार्फत ओळखाव्यात, असा हेतू आहे. त्यायोगे शेअर बाजारातील धोके आधीच ओळखता येतील, हा हेतू असल्याचे ते म्हणाले. जेव्हा बाजारपेठांमधील खेळाडू आधुनिक तंत्रज्ञान वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर वापरतात तेव्हा नियमकांनीदेखील तशीच आधुनिक पद्धतीने देखरेख केली पाहिजे. अर्थात आधुनिक तंत्रज्ञान आऊटसोर्स करता येईल; पण जबाबदारी आऊटसोर्स करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा; २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

SCROLL FOR NEXT