दूरसंचार, फिनटेकने एकत्र यावे ः ज्योतिरादित्य शिंदे
मुंबई, ता. १० : विश्वासार्ह आणि आधुनिक डिजिटल आर्थिक परियंत्रणा उभारण्यासाठी दूरसंचार जाळे व आर्थिक तंत्रज्ञान यांनी एकत्रित काम केले पाहिजे, असे केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज येथे फिनटेक महोत्सवात सांगितले.
डिजिटल सुविधा, आर्थिक व्यवस्था आणि एआय यांना यासंदर्भात एकत्र आणण्याची गरज आहे, यावरही त्यांनी भर दिला. केवळ लोकांना आणि आर्थिक व्यवस्थेला जोडण्याच्या पलीकडे जाऊन आता बुद्धिमत्ता आणि संधी यांना जोडण्यावरच देशाच्या फिनटेक क्षेत्राच्या वाढीचा पुढील टप्पा अवलंबून राहील, असेही ते म्हणाले. फिनटेक क्षेत्राच्या वाढीत देशाच्या दूरसंचार जाळ्याने पायाभूत भूमिका बजावली आहे. कारण आपल्या हातातील मोबाईल फोन हेच आता बँकेची शाखा म्हणून काम करीत आहेत. मोबाईलमुळेच कर्ज, गुंतवणूक या गोष्टी सहज शक्य होत आहेत. फाइव्ह जी, भारत नेट, आधार, यूपीआय, फिनटेक आणि एआय यामुळे देशातील डिजिटल आर्थिक सेवा वाढल्याचेही ते म्हणाले.
एआय, दूरसंचार नेटवर्क आणि आर्थिक डिजिटल पायाभूत सुविधांमुळे कर्जांची पडताळणी, वैयक्तिक आर्थिक सल्ला, फसवणूक ओळखणे, या गोष्टी सहज साध्य होतील आणि त्याद्वारे आपली अर्थव्यवस्था केवळ घटना घडल्यावर प्रतिक्रिया नोंदवण्यापेक्षा आधीच उपाययोजना करणारी स्वायत्त बनेल, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.