मुंबई

विसर्जित ‘पीओपी’ मूर्तींवर शास्त्रीय प्रक्रिया

CD

विसर्जित ‘पीओपी’ मूर्तींवर शास्त्रीय प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ११ : उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार महापालिकेने विसर्जित प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचे संकलन, सुरक्षित साठवणूक, शास्त्रीय प्रक्रिया आणि पुनर्वापर करण्यासाठी एकात्मिक कार्यपद्धती (एसओपी) जाहीर केली आहे.

पालिकेने जारी केलेल्या परिपत्रकानुसार कृत्रिम आणि तात्पुरत्या विसर्जन तलावांमध्ये विसर्जित केलेल्या मूर्ती २४ तासांच्या आत बाहेर काढण्याचे निर्देश सर्व विभागीय सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. यासाठी प्रत्येक विभागात समन्वय अधिकारी, आवश्यक मनुष्यबळ, वैयक्तिक सुरक्षा साधने, क्रेन आणि वाहने उपलब्ध केली जातील. बाहेर काढलेल्या मूर्ती मुलुंड येथील पालिकेच्या मध्यवर्ती साठवण सुविधेमध्ये सुरक्षितपणे पोहोचवल्या जातील. संपूर्ण प्रक्रियेची नोंद, वजनकाट्याच्या पावत्या, छायाचित्रे आणि व्हिडिओ चित्रीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सुमारे २,८५० मेट्रिक टन पीओपी साहित्यावर शास्त्रीय प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी पालिकेने अनुभवी संस्थांकडून ‘स्वारस्य अभिव्यक्ती’ मागवली आहे. इच्छुक संस्था कॅल्सिनेशन, रासायनिक विघटन किंवा अन्य पर्यावरणपूरक तंत्रज्ञान प्रस्तावित करू शकतात. प्रक्रिया केलेल्या साहित्याचा वापर नवीन मूर्ती, प्लास्टर बोर्ड, सिरॅमिक, वैद्यकीय प्लास्टर, विटा किंवा सिमेंट उद्योगात केला जाईल. पालिकेच्या या उपक्रमामुळे जलस्रोतांचे संरक्षण होण्यासोबतच कचऱ्याचा पुनर्वापर करणारी पर्यावरणपूरक चक्रीय व्यवस्था (सर्क्युलर इकॉनोमी) निर्माण होईल, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.
........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

काय राव, सगळ्या DRSचं क्रेडिट तू घेतलंस! ईशान किशन किशनने वैभवला चिडवलं; १५ वर्षांच्या पठ्ठ्यानेही लगेच दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय घडलं?

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

SCROLL FOR NEXT