पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्तपदी अण्णा बनसोडे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्तपदी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची निवड करण्यात आली. मुंबईतील गरवारे क्लब येथे केंद्रीय मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत बनसोडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
बनसोडे यांच्या निवडीने सोसायटीच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला नवी दिशा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक परिवर्तनाचे कार्य पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असा विश्वास विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा पुढे नेण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार आहे. विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. या वेळी कार्यकारिणीच्या बैठकीत सुखदेव थोरात, संचालक उज्ज्वल निकम, डॉ. वासुदेव गाडे, बी. के. बर्वे, विश्वास पाटील, डॉ. वेंकटा स्वामी, अरविंद सोनटक्के, डॉ. एस. एक. भागवत उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.