मुंबई

मुंबईत गंभीर मलेरियाचा वाढता धोका

CD

मुंबईत गंभीर मलेरियाचा वाढता धोका
फाल्सीपेरमच्या रुग्णांत १७८ टक्के वाढ; चारपैकी एका रुग्णाला गंभीर प्रकार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईत मलेरियाचे स्वरूप बदलत असून, अधिक गंभीर मानल्या जाणाऱ्या ‘प्लाज्मोडियम फाल्सीपेरम’ प्रकाराचा वाढता प्रादुर्भाव चिंतेचा विषय ठरत आहे. २०२३ ते २०२५ या दोन वर्षांत फाल्सीपेरमच्या रुग्णसंख्येत तब्बल २.८ पट वाढ झाली असून, एकूण मलेरिया रुग्णांमधील त्याचा वाटा १२ टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी मिळवलेल्या महापालिका आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, २०२३ मध्ये मुंबईत मलेरियाचे एकूण सात हजार ३१९ रुग्ण आढळले. त्यापैकी प्लाज्मोडियम विवॅक्सचे सहा हजार ३९५, फाल्सीपेरमचे ८६४, तर मिश्र संसर्गाचे ६० रुग्ण होते. मिश्र संसर्ग संबंधित प्रकारात धरल्यास विवॅक्सचा वाटा सुमारे ८८ टक्के, तर फाल्सीपेरमचा १२ टक्के होता.
२०२५ मध्ये मलेरियाचे रुग्ण वाढून १० हजार १६३ झाले. यामध्ये विवॅक्सचे सात हजार ५९१, फाल्सीपेरमचे दोन हजार ३८२, तर मिश्र संसर्गाचे १९० रुग्ण होते. फाल्सीपेरम आणि मिश्र संसर्गाचे एकत्रित रुग्ण ९२४ वरून दोन हजार ५७२ झाले. म्हणजेच त्यात तब्बल १७८ टक्क्यांची वाढ झाली.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, मलेरियाच्या एकूण रुग्णसंख्येबरोबरच त्याच्या प्रकारावरही सातत्याने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. फाल्सीपेरमचे वेळेत निदान आणि तातडीने उपचार, तसेच डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.

चारपैकी एका रुग्णाला गंभीर प्रकार
२०२५ मध्ये मलेरियाच्या जवळपास चारपैकी एका रुग्णाला फाल्सीपेरम किंवा मिश्र संसर्ग असल्याचे आकडेवारीतून दिसते. फाल्सीपेरममुळे संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचून गंभीर आजार होऊ शकतो. तसेच लाल रक्तपेशी वेगाने नष्ट होणे, मूत्रपिंडांवर गंभीर परिणाम, फुप्फुस सांत द्रव साचणे, प्राणवायूची कमतरता, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत बिघाड, रक्तस्राव आणि रक्तातील साखर धोकादायकरीत्या कमी होणे यांसारख्या गुंतागुंती निर्माण होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT