मुंबई

सावंतवाडी एक्सप्रेसमध्ये अस्वच्छतेचा ठपका

CD

सावंतवाडी एक्स्प्रेसवर अस्वच्छतेचा ठपका
जुन्या रॅकचे व्हिडिओ व्हायरल; प्रवाशांचा संताप


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची सोय व्हावी, यासाठी मुंबई-सावंतवाडीदरम्यान सुरू करण्यात आलेल्या नव्या गाडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. मात्र, उद्‍घाटनावेळी चकचकीत नवा रॅक दाखविण्यात आला असतानाच प्रत्यक्ष सेवेत जुना रॅक वापरण्यात येत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. त्यातच डबे आणि प्रसाधनगृहांमधील अस्वच्छतेचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने रेल्वेच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते. ही बाब लक्षात घेऊन १५०८७ क्रमांकाची गाडी सुरू करण्यात आली. उद्‍घाटनावेळी नव्या रॅकमुळे प्रवाशांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, प्रत्यक्ष सेवा सुरू झाल्यानंतर या गाडीसाठी १२५३३ क्रमांकाच्या गोमती नगर-सीएसएमटी एक्स्प्रेसचा रॅक वापरला जात असल्याचे समोर आले. गाडीतील डबे आणि प्रसाधनगृहांमध्ये अस्वच्छता असल्याचे दाखविणारे व्हिडिओ प्रवाशांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केले आहेत. गणेशोत्सवाच्या गर्दीच्या काळात लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी उपलब्ध करून दिलेल्या गाडीत स्वच्छता, पाणी आणि अन्य मूलभूत सुविधांची योग्य व्यवस्था असणे अपेक्षित आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन रॅकची स्वच्छता आणि देखभाल सुधारावी, अशी मागणी होत आहे.

स्वच्छतेपूर्वीचा व्हिडिओ असल्याचा रेल्वेचा दावा
रेल्वेच्या म्हणण्यानुसार, १५०८७ क्रमांकाची गाडी सीएसएमटीहून सावंतवाडीसाठी दररोज रात्री ११.५५ वाजता सुटते. १२५३३ क्रमांकाची गोमती नगर-सीएसएमटी गाडी रात्री ९.२० वाजता सीएसएमटीला पोहोचल्यानंतर तिचा रॅक लिंक सर्व्हिस म्हणून सावंतवाडी गाडीसाठी वापरला जातो. समाजमाध्यमांवर प्रसारित झालेला व्हिडिओ गाडीच्या आतील भागाची स्वच्छता करण्यापूर्वीचा असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. स्वच्छता पूर्ण झाल्याची खात्री केल्यानंतरच गाडी रवाना केली जाते. प्रवाशांच्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्याचेही रेल्वेने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT