मुंबई

नागरिकांच्या सहभागातून कामाठीपुराचा कायापालट

CD

नागरिकांच्या सहभागातून कामाठीपुराचा कायापालट

नागरिकांच्या सहभागातून कामाठीपुराचा सर्वांगीण विकास

म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची ग्वाही; प्रकल्पाच्या आराखड्याचे सादरीकरण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : ‘कामठीपुरा हा मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जडणघडणीचा अविभाज्य भाग आहे. या परिसराचा पुनर्विकास म्हणजे केवळ जुन्या इमारतींची पुनर्बांधणी नव्हे, तर येथील नागरिकांना सुरक्षित, सन्मानजनक आणि आधुनिक जीवनमान उपलब्ध करून देत कामाठीपुराचे सर्वांगीण, नियोजित आणि शाश्वत परिवर्तन घडविणारा विकास साधला जाईल,’ अशी ग्वाही शुक्रवारी (ता. ११) म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिली. तसेच ‘हा पुनर्विकास प्रकल्प हा नागरिकांचा सहभाग, पारदर्शकता आणि संवाद या तत्त्वांवर पुढे नेण्यात येईल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

कामाठीपुरा परिसराच्या सर्वांगीण, नियोजित आणि नागरिककेंद्रित विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाच्या नियोजित आराखड्याचे सादरीकरण व जनसंवाद कार्यक्रम आज म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ आणि कामाठीपुरा विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता. कामाठीपुरा येथील अखिल पद्मशाली समाज सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या वेळी संजीव जयस्वाल यांनी सांगितले, की ‘कामाठीपुराच्या पुनर्विकासात नागरिकांच्या अपेक्षा आणि हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. पुनर्विकासाची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने आणि स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन पुढे नेण्यात येणार असून, नियोजित आराखड्याच्या माध्यमातून नागरिकांना प्रकल्पाची व्याप्ती, पुनर्वसनाचे नियोजन, प्रस्तावित सुविधा आणि भविष्यातील विकासाची दिशा स्पष्टपणे समजावी, हा या जनसंवादाचा प्रमुख उद्देश आहे,’ असे त्यांनी सांगितले.
या वेळी खासदार अरविंद सावंत, आमदार अमीन पटेल, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, विकसक अनुप खंडेलवाल यांच्यासह कामाठीपुरा विकास समितीचे पदाधिकारी, स्थानिक रहिवासी, भाडेकरू, जमीनमालक आणि विविध घटकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक नागरिक, भाडेकरू आणि जमीनमालकांनी प्रकल्पाबाबत आपल्या सूचना, अपेक्षा आणि प्रश्न मांडले. त्याला संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तरे देत प्रकल्पाबाबत आवश्यक माहिती दिली.

भाडेकरूंचे नियोजित पुनर्वसन
सुमारे ३४ एकर क्षेत्रावर प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पाच्या कक्षेत सुमारे ४७५ सेस आणि २५९ नॉन-सेस इमारतींचा समावेश आहे. या प्रकल्पाशी सुमारे ८,००० हून अधिक रहिवासी व भाडेकरू, त्यामध्ये सुमारे ६,६२५ निवासी आणि १,३७६ व्यावसायिक भाडेकरू, तसेच सुमारे ८०० जमीनमालक संबंधित आहेत. पुनर्विकासाच्या माध्यमातून विद्यमान रहिवासी व भाडेकरूंचे नियोजित पुनर्वसन करण्याबरोबरच सुमारे ४,५०० अतिरिक्त गृहनिर्माण सदनिकांची निर्मिती करण्याचे नियोजन आहे.


आराखड्यात काय?
कामाठीपुराच्या प्रस्तावित आराखड्यामध्ये आधुनिक व भूकंपरोधक बांधकाम तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक वास्तुरचना, पावसाच्या पाण्याचे संधारण, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, हरित क्षेत्रे, आधुनिक अग्निसुरक्षा व्यवस्था, लिफ्ट सुविधा, अंतर्गत रस्ते व वाहतूक व्यवस्था तसेच आवश्यक सामाजिक व नागरी सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत म्हाडाने अनेक मागण्यांना मान्यता दिली असून, काही मागण्यांबाबत आवश्यक कार्यवाही व नियोजनाचे निर्देश देण्यात आले आहेत.
---
दोन वर्षांचे आगाऊ भाडे
पुनर्विकासाच्या कालावधीत रहिवाशांना आर्थिक स्थैर्य मिळावे, यासाठी दोन वर्षांचे आगाऊ भाडे तसेच पुढील एक वर्षाचे धनादेश देण्यास मान्यता देण्यात आली आहे. स्थलांतर व इतर आनुषंगिक खर्चासाठी एकवेळ २५ हजार रुपये देण्यासही मान्यता देण्यात आली आहे. खोली, दुकान अथवा गाळा रिकामा केल्यानंतर टप्प्याटप्प्याने भाडे देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. बिगरनिवासी गाळेधारकांच्या मागणीचा विचार करून क्षेत्रफळानुसार वाढीव भाड्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार २०० चौ.फू.पर्यंत २५ हजार रुपये, २०० ते ४०० चौ.फू. क्षेत्रासाठी ३० हजार रुपये आणि ४०० चौ.फू.पेक्षा अधिक क्षेत्रासाठी ३५ हजार रुपये प्रतिमाह भाडे मिळणार असून जमीनमालकांना पुनर्विकास कालावधीत प्रति प्लॉट २५ हजार रुपये प्रतिमाह भाडे देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT