उद्योगांनी रोजगारनिर्मितीसाठी पुढाकार घ्यावा : लोढा
मुंबई, ता. १२ : ‘महाराष्ट्रात बेरोजगार युवक-युवतींची संख्या मोठी असली तरी त्याचवेळी रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांना चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्योगांनी पुढाकार घेण्याची गरज आहे,’ असे कौशल्य रोजगार विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी येथे सांगितले.
महाराष्ट्रात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’ येत्या २९ सप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी वांद्रे पूर्व येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ‘एम्प्लॉयर राउंड टेबल’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी लोढा बोलत होते. संपूर्ण महाराष्ट्रातील उद्योग व आस्थापनांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहनही लोढा यांनी केले. युवकांना रोजगार देणे हे केवळ सरकारचे काम नसून, ते सामाजिक उत्तरदायित्व आहे, या भावनेतून राज्यातील जास्तीत जास्त उद्योगांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे. राज्यात रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. कंपन्यांकडे उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या रिक्त जागांची माहिती आम्हाला द्यावी. त्यासाठी आवश्यक कौशल्ये असलेले योग्य युवक-युवती आम्ही उपलब्ध करून देऊ. परदेशात कुशल तरुणांना चांगल्या नोकऱ्या मिळतात. राज्यातही कुशल तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी उद्योगांनी पुढाकार घ्यावा, असे लोढा यांनी सांगितले. या मेळाव्यास ३२ मोठ्या उद्योगांचे प्रतिनिधी हजर होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.