मुंबई

गणपतीसाठी ३८६ विशेष गाड्या

CD

काेकणासाठी आणखी
चार अनारक्षित रेल्वेगाड्या

गणपतीसाठी ३८६ विशेष गाड्या

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : गणेशाेत्सवासाठी काेकणात जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेने मुंबईतून आणखी चार अनारक्षित फेऱ्या जाहीर केल्या आहेत. गाडी क्रमांक ०१००९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून १२ आणि १३ सप्टेंबरला दुपारी १.४५ वाजता सुटेल, तर परतीची गाडी क्रमांक ०१०१० सावंतवाडी रोडहून १३ आणि १४ सप्टेंबरला पहाटे ४.०५ वाजता सुटणार आहे.

अनारक्षित गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झारापसह २३ स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. या गाड्यांना १२ शयनयान, सहा सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन गार्ड ब्रेक व्हॅन असतील. अनारक्षित डब्यांसाठी यूटीएस प्रणाली तसेच ‘रेलवन’ ॲपद्वारे तिकीट काढता येणार आहे.
दरम्यान, गणेशोत्सवासाठी १४ ते १५ सप्टेंबरदरम्यान देशभरात ३८६ गणपती विशेष गाड्या धावणार आहेत. यामध्ये मध्य रेल्वेच्या २५८, पश्चिम रेल्वेच्या ६४, कोकण रेल्वेच्या ५८ आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या सहा विशेष गाड्यांचा समावेश आहे. स्थानकांवर आरपीएफ, जीआरपी आणि शहर पोलिस यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

SCROLL FOR NEXT