मुंबई

मुंबईतील चार पूल धोकादायक

CD

मुंबईतील चार पूल धोकादायक
स्ट्रक्चरल ऑडिटनंतर पूल बंद करण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : गणेशोत्सवाच्या काळात लाखो प्रवाशांची गर्दी होणार असताना मशीद आणि माटुंगा परिसरातील चार पादचारी पूल धोकादायक ठरले आहेत. आयआयटी मुंबईच्या संरचनात्मक तपासणीत या पुलांची अवस्था असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ते तातडीने पादचाऱ्यांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुलांच्या महत्त्वाच्या भागांची झीज झाली असून गंज लागल्याचे तपासणीत आढळले आहे. त्यामुळे हे पूल पाडून नव्याने बांधण्याची शिफारस करण्यात आली आहे.

मुंबई महापालिका आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी २७ ऑगस्टला या पुलांची संयुक्त पाहणी केली होती. त्यानंतर आयआयटी मुंबईने ३१ ऑगस्टला चारही पुलांचे स्वतंत्र संरचनात्मक तपासणी अहवाल सादर केले. अहवालातील सुरक्षेच्या चिंतेनंतर महापालिकेने रेल्वे प्रशासनाला हे पूल तातडीने बंद करून पुढील सूचना मिळेपर्यंत पादचारी वाहतूक पूर्णपणे थांबविण्याची विनंती केली आहे. यामध्ये मशीद येथील भंडारी पादचारी पूल आणि मशीद स्थानकावरील पादचारी पूल बंद करण्यात येणार आहेत. माटुंग्यातील भाऊ दाजी रोडवरील लेव्हल क्रॉसिंगवरील पादचारी पूल तसेच गुरू नानक हायस्कूलजवळील माटुंगा-धारावी पादचारी पूलही वापरासाठी बंद केले जाणार आहेत.

गणेशोत्सवात गर्दीचे आव्हान
गणेशोत्सवात स्थानके आणि परिसरात नेहमीपेक्षा मोठी गर्दी होते. अशा वेळी असुरक्षित ठरलेल्या पुलांवर पादचाऱ्यांची गर्दी होऊन दुर्घटनेचा धोका वाढू शकतो. त्यामुळे संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी पुलांचा वापर पूर्णपणे रोखणे आवश्यक असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. जनतेने पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

SCROLL FOR NEXT