तमन सफारीची भारतीय पर्यटकांना साद
इंडोनेशियात भारतीय पर्यटकांसाठी खास सुविधा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : इंडोनेशियातील सहा ठिकाणी आणि चार रिसॉर्टमध्ये कार्यरत असलेल्या तमन सफारी इंडोनेशियाने भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आमंत्रण दिले आहे. जागतिक दर्जाचे थीम मनोरंजन उद्यान आणि वन्यजीव संरक्षण संस्था म्हणून ओळख असलेल्या तमन सफारीमध्ये सुमारे २२ हजार प्राण्यांचे संगोपन केले जाते.
इंडोनेशियात जाणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. २०२३ मध्ये सुमारे सहा लाखांहून अधिक भारतीय पर्यटकांनी इंडोनेशियाला भेट दिली. २०२४ मध्ये ही संख्या सात लाखांहून अधिक झाली. २०२६ मध्ये साडेसात ते सव्वा आठ लाख भारतीय पर्यटक इंडोनेशियात येतील, असा पर्यटन मंत्रालयाचा अंदाज आहे. दिल्ली, मुंबई आणि बंगळूर येथून बाली व जकार्तासाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे, अशी माहिती तमन सफारीचे मुख्य विपणन अधिकारी अलेक्झांडर झुलकर्नैन यांनी दिली. भारतीय पासपोर्टधारकांना व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा असून, हा व्हिसा ३० दिवसांसाठी वैध असतो. त्याची एकदा मुदतवाढही करता येते.
----
६७३ प्रजातींचे अनोखे विश्व
तमन सफारीमध्ये ६७३ प्रजातींचे जलचर, पक्षी आणि भूचर प्राणी आहेत. आफ्रिका, भारत, आशिया तसेच इंडोनेशियातील विविध प्राण्यांचा येथे समावेश आहे. मरीन सफारी, जंगल सफारी, सोलो सफारी, बीच सफारी आणि मत्स्यालयांच्या माध्यमातून कमोडो ड्रॅगन, सुमात्रातील हत्ती, आफ्रिकेतील सिंह, डॉल्फिन आदी प्राणी जवळून पाहता येतात. येथील रिसॉर्टमध्ये शाकाहारी, जैन तसेच भारतीय खाद्यपदार्थांचे पर्याय उपलब्ध आहेत. काही ठिकाणी भारतीय शेफही कार्यरत आहेत. पर्यटकांसाठी खासगी वाहने, बहुभाषिक पर्यटन सेवा आणि विविध प्रवास पॅकेज उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
----
प्राण्यांचे बचाव अन् पुनर्वसन
तमन सफारीकडून हजारो प्राण्यांचे बचावकार्य आणि पुनर्वसन केले जाते. त्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे कामही केले जाते. इंडोनेशियातील स्थानिक तसेच लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या वन्यजीवांच्या संरक्षणासाठी अग्रगण्य जागतिक संस्था म्हणून तमन सफारीची ओळख आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.