मुंबई

नोकरकपातीसाठी नव्हे, विस्तारासाठी वापरा एआय

CD

नोकरकपातीसाठी नव्हे, विस्तारासाठी वापरा एआय
सेल्सफोर्स इंडियाच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांचे उद्योगांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : भारतीय उद्योगांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर नोकरकपातीसाठी नव्हे, तर व्यवसाय विस्तारासाठी करावा, असे आवाहन सेल्सफोर्स इंडियाच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरुंधती भट्टाचार्य यांनी केले.

आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्सचा १२०वा स्थापना दिन नुकताच आयएमसीच्या सभागृहात साजरा झाला. त्या वेळी त्या बोलत होत्या. एआयला अचूक आणि उपयुक्त उत्तरे देण्यासाठी विश्वासार्ह माहिती आवश्यक असते. त्यामुळे कंपन्यांनी आपला डेटा सातत्याने अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. तसेच एआयच्या मदतीने मनुष्यबळाची कार्यक्षमता कशी वाढवता येईल, याचा विचार करून कंपन्यांनी आपल्या कामाची फेररचना करावी. त्यानुसार कार्यपद्धतीत आवश्यक ते मोठे बदल करावेत, असे भट्टाचार्य यांनी सांगितले.
----
भविष्यात मोठ्या संधी
एआयमुळे उद्योगांसमोर भविष्यात मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याच्या मदतीने आतापर्यंत न दिसलेल्या बाजारपेठांमध्येही प्रवेश करणे शक्य होईल. याचा सर्वाधिक फायदा कौटुंबिक उद्योगांना होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले. त्यासाठी उद्योगांनी शैक्षणिक क्षेत्राशी सहकार्य वाढवून भविष्यातील गरजा लक्षात घेऊन कुशल मनुष्यबळ तयार ठेवावे. अशा प्रयत्नांतूनच भारतातील उद्योग-व्यवसाय विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यात योगदान देऊ शकतील, असे भट्टाचार्य म्हणाल्या.
----
विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी भविष्यासाठी सज्ज उद्योग उभारणे आवश्यक आहे. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या एमएसएमई क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञान, पुरेसा वित्तपुरवठा आणि व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे. स्टार्टअप्सनी नवकल्पनांना चालना देत आपला व्यवसाय विस्तारावा.
- महेंद्र कुमार चौहान, अध्यक्ष, आयएमसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT