मुंबईत गणेशमूर्तींचा उच्चांक
संख्या दोन लाखांच्या उंबरठ्यावर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुंबईतील गणेशोत्सवाचा उत्साह यंदा अधिक द्विगुणित झाला असून, शहरात प्रतिष्ठापना होणाऱ्या श्रीगणेशमूर्तींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार यंदा घरगुती, सार्वजनिक तसेच गौरींच्या मूर्तींची एकूण संख्या गेल्या वर्षीच्या सर्व नोंदी मोडून नवा उच्चांक प्रस्थापित करण्याच्या मार्गावर आहे. गेल्या वर्षी मुंबईत एक लाख ८८ हजार ३८७ मूर्तींची नोंद झाली होती. यंदा नवीन गृहसंकुले, उपनगरांचा विस्तार आणि भाविकांमधील वाढता उत्साह यामुळे हा एकूण आकडा दोन लाखांच्या समीप पोहोचण्याची चिन्हे आहेत.
गेल्या वर्षी मुंबईकरांनी एक लाख ७३ हजार ५६३ घरगुती गणेशमूर्तींची स्थापना केली होती. यंदा मूर्तिकारांकडील आगाऊ नोंदणीनुसार हा आकडा पावणेदोन लाखांच्या पार गेला आहे. गेल्या वर्षी नऊ हजार ८५२ सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींची नोंद झाली होती. यंदा नव्या सोसायट्या व सार्वजनिक मंडळांच्या पुढाकारामुळे ही संख्या १० हजारांचा टप्पा ओलांडत आहे. परंपरेनुसार घरोघरी पुजल्या जाणाऱ्या गौरींच्या मूर्तींची संख्या गेल्या वर्षी चार हजार ९७२ होती, त्यात यंदाही काही अंशी वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या विविध उपनगरांत वाढलेली नवीन कुटुंबे, सोसायट्यांमध्ये वाढलेले सांस्कृतिक उपक्रम आणि कोरोनाकाळानंतर उत्सवाबाबत वाढलेला प्रचंड उत्साह यामुळे मूर्तींच्या मागणीत वाढ झाली आहे. गल्लीबोळांतील जुनी मंडळे कायम असतानाच नव्या हाउसिंग सोसायट्यांनी स्वतःचे सार्वजनिक उत्सव सुरू केल्याने सार्वजनिक मूर्तींची संख्या वाढली आहे. सर्वच प्रकारांतील या वाढीमुळे यंदाचा गणेशोत्सव मुंबईच्या सांस्कृतिक इतिहासात मूर्तींच्या संख्येबाबत एक नवीन मैलाचा दगड ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.