मुंबई

कल्याणमध्ये लोकलचा खोळंबा; ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड; प्रवाशांना मनस्ताप

CD

कल्याणमध्ये लोकलचा खोळंबा
ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड; प्रवाशांना मनस्ताप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी रविवारी (ता. १३) घराबाहेर पडलेल्या नागरिकांना मध्य रेल्वेच्या विस्कळित वाहतुकीचा फटका बसला. कल्याण रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कसारा दिशेने जाणारी लोकल सेवा विस्कळित झाली. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.

कल्याण स्थानकातील ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यामुळे कसारा डाऊन मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली. डोंबिवलीहून कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकल सेवांवर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे कल्याण स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. या तांत्रिक बिघाडाचा परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावरही झाला. लोकलसह काही एक्स्प्रेस गाड्या सुमारे ४५ मिनिटे रखडल्या. अचानक सेवा विस्कळित झाल्याने प्रवाशांना नियोजित वेळेपेक्षा उशिराने प्रवास करावा लागला. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाहेर पडलेले नागरिक, कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि अन्य प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काही गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ वरून चालविण्यात आल्या. दरम्यान, रेल्वेच्या तांत्रिक पथकाने ओव्हरहेड वायरमधील बिघाड दुरुस्तीचे काम हाती घेतले. बिघाड दूर करून लोकल सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT