मुंबई

गणेशोत्सवावर पावसाचे सावट

CD

गणेशोत्सवावर पावसाचे सावट
हवामान खात्याचा आजही मुसळधारेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १३ : मुंबईसह उपनगरांत गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी (ता. १३) गणेश आगमन सोहळ्यात मोठा व्यत्यय निर्माण झाला. ठिकठिकाणी साचलेले पाणी आणि पावसामुळे आगमन मिरवणुकांमध्ये कार्यकर्त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. सोमवारी (ता. १४) श्री गणेशाची घरोघरी आणि मंडळांमध्ये प्राणप्रतिष्ठापना होणार आहे; मात्र हवामान खात्याने सोमवारीही मुसळधार पावसाचा आणि वेगाच्या वाऱ्याचा इशारा दिल्याने गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पावसाचे मोठे सावट पसरले आहे.

शनिवारी रात्रीपासूनच मुंबई आणि परिसरात पावसाचा जोर वाढला होता. रविवारी दिवसभरात पश्चिम उपनगरांत ५९.८६ मिमी, पूर्व उपनगरांत ५२.२८ मिमी तर शहरात ४३.८२ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली. वांद्रे, बोरिवली, दादर आणि चेंबूर परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत निघणाऱ्या आगमन मिरवणुकांवर पावसाने पाणी फेरले. प्लॅस्टिक आणि ताडपत्रीच्या सहाय्याने मूर्ती सुरक्षित ठेवत मिरवणुका पार पाडाव्या लागल्या. हवामान विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार, सोमवारी मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सकाळी मुहूर्त साधून गणेशाची मूर्ती घरी आणणे आणि पूजा-अर्चा करणे भाविकांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. उद्यादेखील आकाश पूर्णपणे ढगाळ राहून काही भागांत अतिमुसळधार पावसाच्या सरी कोसळतील. सोमवारी मध्यरात्री १:३८ वाजता ४.४३ मीटरची तर दुपारी १:०५ वाजता ४.४६ मीटरची मोठी भरती असणार आहे. भरतीच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास मुंबईतील सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता वर्तविली आहे.

पावसाची शक्यता विचारात घेऊन पालिकेची आपत्कालीन यंत्रणा, अग्निशामक दल आणि कोस्ट गार्ड सतर्क ठेवण्यात आले आहेत. भाविकांनी भरतीच्या वेळी समुद्रात किंवा चौपाटीवर जाणे टाळावे आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

आजचा पाऊस : आकडेवारी (मिमीमध्ये)
बीकेसी - १४७.६
बोरिवली - १३८
वांद्रे - १३५.६
गोवंडी - १३५.६
मागाठाणे - १३३.६
चेंबूर - १३२.८
प्रभादेवी - १०६.२
दादर - १०३.८
शिवडी - ९८.४
..............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Eknath Shinde Meeting : अमित शहा-एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा तास चर्चा; एकाच कारमधून प्रवास, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

IND vs AFG, Video: बुमराह आला अन् दुसऱ्याच बॉलवर विकेट घेतली! भुवनेश्वर कुमारच्या पंक्तीत मिळवलं स्थान

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? सौदीची पाइपलाइन बंद, फक्त ५ ते ७ दिवसांचा तेलसाठा शिल्लक

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

SCROLL FOR NEXT