एसआरएच्या भाडे न्यायनिवाडा कक्षांमुळे झोपडीधारकांना दिलासा
दोन वर्षांत तीन हजारांहून अधिक प्रकरणे निकाली; ५२ कोटी रुपयांहून अधिक रकमेचे भाडे वसूल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) स्थापन केलेल्या विशेष भाडे न्यायनिवाडा व वसुली कक्षांमुळे झोपडीधारकांना मोठा दिलासा मिळत आहे. गेल्या दोन वर्षांत या कक्षांमार्फत ३,४१० प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, ५२ कोटी रुपयांहून अधिक भाड्याची वसुली करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष भाडे न्यायनिवाडा व वसुली कक्ष हे दोन विशेष कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. एसआरए परिपत्रक २३३ अन्वये स्थापन झालेल्या कक्ष क्रमांक १ अंतर्गत पूर्व व पश्चिम उपनगरे, तर कक्ष क्रमांक २ अंतर्गत मुंबई शहराचा समावेश आहे.
- कक्ष क्रमांक १ कडे आतापर्यंत २,०५८ प्रकरणे प्राप्त झाली असून, त्यापैकी १,८६२ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. या कार्यवाहीतून ३७ कोटींहून अधिक भाडे वसूल झाले असून, ६१ कोटींहून अधिक रकमेबाबत झोपडीधारकांच्या बाजूने आदेश पारित करण्यात आले आहेत. १६३ प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे.
- कक्ष क्रमांक २ कडे १,६८७ प्रकरणे प्राप्त झाली असून, १,५४८ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. या कक्षाने १५ कोटींहून अधिक भाडे वसूल केले असून, १६ कोटींहून अधिक रकमेबाबत झोपडीधारकांच्या बाजूने आदेश दिले आहेत.
१,४४० कोटींचे आगाऊ भाडे वसूल
एसआरए परिपत्रक २१० अन्वये २०२५-२६ मध्ये ४१७ योजनांमधून १,४४० कोटी रुपयांचे आगाऊ भाडे वसूल करण्यात आले आहे. तसेच १५ योजनांमधील हजारो पात्र झोपडीधारकांना त्यांच्या हक्काच्या भाड्याचे वाटप करण्यात आले आहे. ८० योजनांचे स्वयंप्रेरणेने लेखापरीक्षणही प्रगतिपथावर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.