मुंबई

कुंभमेळ्यापूर्वी रेल्वेची पायाभरणी - खेरवाडी यार्डात ट्रॅकचे महत्त्वाचे काम पूर्ण; गर्दीच्या नियोजनासाठी मध्य रेल्वेची तयारी

CD

कुंभमेळ्यापूर्वी रेल्वेची पायाभरणी
खेरवाडी यार्डात ट्रॅकचे महत्त्वाचे काम पूर्ण; गर्दीच्या नियोजनासाठी मध्य रेल्वेची तयारी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा-२०२७ साठी भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आतापासूनच पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाला वेग दिला आहे. कुंभमेळ्याच्या काळात वाढणारी प्रवासीसंख्या आणि रेल्वे वाहतुकीचा ताण हाताळण्यासाठी ट्रॅक व यार्डमधील महत्त्वाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याअंतर्गत खेरवाडी यार्डात रविवारी (ता. १३) अप आणि डाऊन मार्गावर संयुक्त ब्लॉक घेऊन ट्रॅकची महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात आली.
दुपारी १.१० ते ३.४० या अडीच तासांच्या ब्लॉकमध्ये सीएसएमटीच्या दिशेकडील विद्यमान क्रॉसओव्हर काढण्यात आला. त्यासाठी आधुनिक ट्रॅक मशीनसह मोठ्या संख्येने कुशल कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्याचवेळी भुसावळच्या दिशेकडील बाजूस थिक वेब स्विच (टीडब्ल्यूएस) आणि क्रॉसिंग बसविण्याचे कामही करण्यात आले. निर्धारित वेळेत काम पूर्ण करून रेल्वे वाहतूक वेळेत पूर्ववत करण्यात आली.

गर्दी वाढण्यापूर्वी तयारी
कुंभमेळ्याच्या काळात नाशिककडे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिरिक्त गाड्या आणि वाढलेली प्रवासी गर्दी हाताळण्यासाठी रेल्वे मार्गाची क्षमता आणि परिचालन व्यवस्था सक्षम करण्यावर मध्य रेल्वेचा भर आहे. यासाठी ट्रॅक, यार्ड आणि अन्य पायाभूत सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा केल्या जात आहेत.

समन्वयातून कामाला वेग
खेरवाडी यार्डातील कामासाठी अभियांत्रिकी आणि परिचालन विभागाच्या पथकांनी समन्वयाने काम केले. मर्यादित ब्लॉकमध्ये क्रॉसओव्हर हटविण्यासह टीडब्ल्यूएस आणि क्रॉसिंग बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले. कुंभमेळ्याच्या काळात सुरक्षित आणि सुरळीत रेल्वे वाहतूक सुरू ठेवण्यासाठी अशी कामे पुढील काळातही टप्प्याटप्प्याने केली जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar News : नातवाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच आजीनेही सोडले प्राण; खानदेशी कुटुंबावर दुहेरी दुःखाचा आघात

Latest Marathi News Update : औसा तहसील कार्यालयावर महिलांचा मोर्चा; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Pune News : मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्यात कार घालण्याचा प्रयत्न; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

Kannad News : शेतकऱ्यांमध्ये संभ्रम! कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीत २,५०५ शेतकरी पात्र

Pune Ganeshotsav : पुण्यात यंदा प्रथमच ‘राज्य सांस्कृतिक महोत्सव’; शनिवारवाड्यावर ढोल-ताशा, काव्य आणि लोककलेचा त्रिवेणी संगम

SCROLL FOR NEXT