गणरायाच्या उत्सवाला ‘एआय’ची जोड
मंडपांच्या संकल्पनेपासून डिजिटल आरतीपर्यंत तंत्रज्ञानाचा वाढता वापर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई ता. १६ : यंदाच्या पारंपरिक गणेशोत्सवाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याचे दिसत आहे. मूर्तींच्या सजावटीपासून मंडपांच्या थीमपर्यंत, डिजिटल आरतीपासून सोशल मीडिया प्रचारापर्यंत एआयचा वापर वाढू लागला आहे. त्यामुळे बाप्पाच्या उत्सवाचे स्वरूपही हळूहळू ‘टेक्नॉलॉजी फ्रेंडली’ होत असल्याचे दिसत आहे.
गणेश मंडळांकडून यंदा मंडप आणि देखाव्यांच्या संकल्पना तयार करण्यासाठी एआयचा वापर करण्यात आला. काही मिनिटांत वेगवेगळ्या थीम, रंगसंगती, प्रकाशयोजना आणि सजावटीचे पर्याय तयार होत असल्याने मंडळांना कल्पना प्रत्यक्षात आणण्यापूर्वी डिजिटल स्वरूपात पाहता येत आहे. पारंपरिक उत्सवात सजवतीपासून सगळ्याच गोष्टींना तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे उत्सवाची रंगत वाढली आहे.
एआयच्या माध्यमातून भक्तांसाठी डिजिटल आरती, ऑडिओ-व्हिज्युअल सादरीकरण आणि विविध भाषांमधील भक्तिगीते तयार करण्याचे प्रयोग होत आहेत. मंडपांमध्ये क्यूआर कोडद्वारे आरती, गणेशाची माहिती, आरतीचे बोल आणि कार्यक्रमाचे वेळापत्रक उपलब्ध करून देण्याकडेही मंडळांचा कल आहे.
सोशल मीडियावर प्रचार
गणेश मंडळांच्या सोशल मीडिया प्रचारातही एआयचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आकर्षक पोस्टर, व्हिडिओ, रील्स, निमंत्रणपत्रिका आणि शुभेच्छा संदेश तयार केले जात आहेत. एखाद्या मंडळाच्या थीमनुसार काही सेकंदांत पोस्टर किंवा व्हिडिओची संकल्पना तयार होत असल्याने सोशल मीडिया प्रचार अधिक वेगवान आणि आकर्षक झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.