मुंबई

ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा २०२६ चा निकाल जाहीर

CD

ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षाचा निकाल जाहीर
मुंबई, ता. १५ : ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने जून २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. राज्यातील २९ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. राज्यभरातून या परीक्षेसाठी एकूण दोन हजार २२३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये एक हजार ९०४ नियमित विद्यार्थी आणि ३१९ माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी एक हजार १६५ नियमित विद्यार्थी, तर १३० माजी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेचा एकूण निकाल ६१ टक्के लागला आहे.

राज्यात गोंदिया परीक्षा केंद्राचा निकाल सर्वाधिक १०० टक्के लागला आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे निकालपत्र संबंधित परीक्षा केंद्रांवर पाठविण्यात येत आहेत. दरम्यान, प्राप्त गुणांबाबत फेरगुणमोजणी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयासाठी १० रुपये शुल्क याप्रमाणे अर्ज संबंधित वर्ग व्यवस्थापकांकडे १५ ऑक्टोबरपर्यंत सादर करावा, असे संचालनालयाने कळविले आहे. वर्ग व्यवस्थापकांनी विद्यार्थ्यांकडून जमा झालेले शुल्क एकत्रित करून शासकीय कोषागारात ०२०२ शिक्षण, क्रीडा, कला व संस्कृती (१०५) सार्वजनिक ग्रंथालये (०१) सार्वजनिक ग्रंथालये (१)०३) संकीर्ण जमा (०२०२०५९२) या लेखाशीर्षाखाली चलनाद्वारे जमा करावे. तसेच, चलनाची मूळ प्रत आणि विद्यार्थ्यांचे अर्ज ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत संचालनालयास सादर करणे आवश्यक आहे. या मुदतीनंतर प्राप्त होणारे फेरगुणमोजणीचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, अशी माहिती ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT