मुंबईत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन
मुंबई, ता १५ : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...’ या गगनभेदी जयघोषात, गुलालाची उधळण आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबईत दीड दिवसाच्या लाडक्या गणरायाला आज अत्यंत भावुक वातावरणात निरोप देण्यात आला. रात्री ९ वाजेपर्यंत शहर व उपनगरांत एकूण २५,२३१ मूर्तींचे अत्यंत शांततेत आणि शिस्तीत विसर्जन झाले. कालच मोठ्या उत्साहात आगमन झालेल्या दीड दिवसाच्या गणरायाची आज सकाळपासूनच घरोघरी विधिवत उत्तरपूजा आणि आरती करण्यात आली. दुपारनंतर गणरायाला निरोप देण्यासाठी विसर्जन घाटांवर भाविकांचा ओघ सुरू झाला. अश्रूंची किनार आणि अथांग भक्तीच्या संगमात मुंबईतील समुद्रकिनारे व विसर्जनस्थळे दुमदुमून गेली होती. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्राधान्य देत यंदा बहुतांश भाविकांनी महापालिकेच्या कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यावर भर दिला. दरम्यान, विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासन आणि मुंबई पोलिस दल पूर्णपणे सतर्क होते.
प्रमुख विसर्जन घाट आणि कृत्रिम तलावांच्या ठिकाणी जीवरक्षक, अग्निशामक दल, रुग्णवाहिका आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कडक नजर होती. सुरक्षेच्या दृष्टीने ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मार्गांमध्ये योग्य ते बदल करण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत विसर्जन प्रक्रिया शांततेत सुरू होती.
.........
आकडेवारीवर एक नजर (रात्री ९ वाजेपर्यंत) :
घरगुती गणेशमूर्ती : २४,५२१
सार्वजनिक गणेशमूर्ती : ११०
हरतालिका मूर्ती : ६००
एकूण विसर्जन : २५,२३१
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.