मुंबई

यूपीआय व्यवहारांवर शुल्क लादण्यास व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध; ‘एफआरटीडब्ल्यूए’ची केंद्र सरकारकडे मागणी

CD

यूपीआय व्यवहारांवरील
शुल्कास व्यापाऱ्यांचा विरोध
‘एफआरटीडब्ल्यूए’ची केंद्र सरकारकडे पुनर्विचाराची मागणी
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १६ : डिजिटल व्यवहारांचा कणा मानल्या जाणाऱ्या युनिफाइड पेमेंट इंटरफेस अर्थात ‘यूपीआय’ व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या वित्त मंत्रालयाच्या विचाराविरोधात व्यापाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अगदी कमी प्रमाणात का असेना, पण यूपीआयवर शुल्क आकारणे म्हणजे आधीच आर्थिक संकटात असलेल्या छोट्या दुकानदारांवर अतिरिक्त बोजा टाकण्यासारखे आहे. त्यामुळे यूपीआय व्यवहार हे पूर्णपणे मोफतच राहिले पाहिजेत, अशी ठाम भूमिका ‘फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन’ने घेतली आहे.​ असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शाह यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सरकारला या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन करीत व्यापाऱ्यांची बाजू मांडली आहे.
सध्या ऑनलाइन कंपन्या (ई-कॉमर्स) आणि मोठ्या कॉर्पोरेट रिटेल मॉल्सच्या स्पर्धेमुळे किरकोळ व्यापारी आधीच त्रस्त आहेत. दुकानदारांचा नफा (मार्जिन) कमी झाला असून, व्यवसायाचा खर्च मात्र वाढत चालला आहे. अशा स्थितीत डिजिटल व्यवहारांवर शुल्क लादल्यास व्यापाऱ्यांच्या उरल्यासुरल्या नफ्यावरही गदा येईल. ‘‘२,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेवर ०.४ टक्के शुल्क (जास्तीत जास्त ३०० रुपये) आकारण्याचा प्रस्ताव लहान वाटत असला तरी भविष्यात हा कर आणखी वाढण्याची भीती आहे,’’ अशी चिंता वीरेन शाह यांनी व्यक्त केली. ​व्यापारी संघटनेने आपल्या निवेदनात मुख्य मुद्दे मांडताना सांगितले आहे, की यूपीआय हे सर्वसामान्य आणि व्यापाऱ्यांसाठी एक सोपे, सुरक्षित अन् विनाशुल्क माध्यम म्हणून लोकप्रिय झाले. क्रेडिट कार्डप्रमाणे यूपीआयलाही सरकारच्या कमाईचे साधन बनवले, तर डिजिटल व्यवहारांचा मूळ उद्देशच मोडीत निघेल.

डिजिटल इंडिया मोहिमेला धक्का
यूपीआयवर शुल्क आकारल्यास व्यापारी आणि ग्राहक पुन्हा रोखीने व्यवहार करण्यास किंवा इतर पर्यायांकडे वळण्यास भाग पडतील. यामुळे डिजिटल इंडिया मोहिमेला धक्का पोहोचू शकतो. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी लागणारा खर्च सरकारने स्वतः सहन करावा. त्याचा बोजा आधीच अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांवर टाकू नये. ​‘‘लहान दुकानदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असताना, त्यांच्यावर नवीन शुल्काची कुऱ्हाड चालवू नका. यूपीआय पूर्णपणे मोफतच ठेवण्यात यावे,’’ अशी स्पष्ट मागणी व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI ची मोठी घोषणा! WPL 2027 च्या तारखा जाहीर; २८ ऑक्टोबरला ऑक्शन, फ्रँचायझीला या महिन्याची दिलीय डेडलाईन, नेमकं काय?

Road Development : धनंजय मुंडेंच्या मागणीला यश! लोखंडी सावरगाव-बर्दापूर फाटा रस्ता होणार चौपदरी; १०४.४९ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध

Saudi Arabia Drone Attack : मुस्लिमांसाठी पवित्र मक्कावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न ; सौदीने हवेतच केले नष्ट, भारताने व्यक्त केली चिंता

Gangapur News : शिक्षकांची बंद केलेली वेतनवाढ आदेश त्वरित रद्द करावा; आमदार सतीश चव्हाण यांची मागणी

Nagpur News : सहकाराचा गाडा रुळावरून घसरला! दहा वर्षांत आठ सहकारी पतसंस्था डबघाईस, २२ संस्था अवसायनात; मौद्यात सहकार संकटात

SCROLL FOR NEXT