प्रकल्पग्रस्तांसाठी घेतलेल्या घरांचे एमएमआरडीए भाडे देईना!
शिवशाहीकडून तीव्र नाराजी; १४० घरांचे दोन वर्षांचे तीन कोटी भाडे थकवले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईसह एमएमआरडीए क्षेत्रात हजारो कोटी रुपयांचे मेट्रो, रस्ते, सी लिंक असे वेगवेगळे प्रकल्प करणारे एमएमआरडीएने आपल्या प्रकल्पग्रस्तांकरिता १४० घरे शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाकडून घेतली आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या घरांचे सुमारे दोन कोटी ८३ लाख रुपयांचे भाडे थकवले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही भाडे मिळत नसल्याने शिवशाहीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातून अतिरिक्त तयार होणाऱ्या सदनिका एसआरएकडून संक्रमण सदनिका म्हणून शिवशाहीकडे दिल्या जातात. त्यानुसार एसआरए प्रकल्प राबविणाऱ्या विकसकांना तात्पुरत्या स्वरूपात या सदनिका भाडेतत्त्वावर झोपडपट्टीधारकांसाठी उपलब्ध करून दिल्या जातात. दरम्यान, एमएमआरडीएकडून शिवडी-वरळी उन्नत मार्गाचे काम हाती घेताना येथील प्रकल्पबाधितांसाठी त्यांनी शिवशाहीची जसमीन मिल धारावी येथील १४० घरे २०२२ मध्ये भाडेतत्त्वावर घेतली आहेत. मासिक ८,००० हजार रुपये भाडे निश्चित केले होते. त्यानुसार एमएमआरडीएने पहिल्या दोन वर्षांचे भाडे शिवशाहीला इमानेइतबारे दिले आहे. मात्र गेल्या दोन वर्षांत भाडे थकीत ठेवले आहे. तसेच हे भाडे माफ करावे, अशी मागणी एमएमआरडीए गृहनिर्माण विभागाकडे केली आहे. त्यामुळे आता ते भाडे वसूल कसे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भाड्यावरून जुंपणार
शिवशाहीने एमएमआरडीएला भाडेतत्त्वावर घरे दिली आहेत. त्याचे भाडे त्यांनी देणे बंधनकारक आहे. त्यानुसार मागील दोन वर्षांचे भाडे आम्ही वसूल करणार असून, त्याबाबत गृहनिर्माण विभागाकडे प्रस्ताव दिला असल्याचे शिवशाहीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे भाड्यावरून शिवशाही आणि एमएमआरडीएमध्ये जुंपणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.