‘गणराया, सरकारला सुबुद्धी दे!’
नीट पेपरफुटी, शेतकरी आत्महत्येवर गणेशोत्सवात सामाजिक देखावा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभरात विद्यार्थ्यांची आंदोलने आणि संताप व्यक्त होत असताना, यंदाच्या गणेशोत्सवात या प्रश्नाचे पडसाद उमटले आहेत. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मनसेचे चेंबूर विभाग अध्यक्ष माउली थोरवे यांनी आपल्या घरगुती गणेशोत्सवात नीट पेपरफुटी आणि शेतकरी आत्महत्येवर आधारित सामाजिक देखावा साकारला आहे. या देखाव्यातून ‘सरकारला सुबुद्धी दे रे गणराया’ असा संदेश देण्यात आला आहे.
नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार, पेपरफुटीचे आरोप आणि त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष हा सध्या देशभरातील चर्चेचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न थोरवे यांनी केला आहे. देखाव्यात नीट परीक्षेतील पेपरफुटीचा मुद्दा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जोडण्यात आला असून, शिक्षणव्यवस्थेतील गैरप्रकारांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
यासोबतच शेतकरी आत्महत्येचाही विषय देखाव्यात मांडण्यात आला आहे. देशाच्या अन्नव्यवस्थेचा आधार असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाने गांभीर्याने पाहावे, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.
माउली थोरवे हे दरवर्षी गणेशोत्सवात सामाजिक विषयावर भाष्य करणारे देखावे साकारतात. केवळ धार्मिक उत्सवापुरता गणेशोत्सव मर्यादित न ठेवता, त्यातून समाजातील विविध प्रश्नांवर जनजागृती करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. यापूर्वी त्यांनी महिला अत्याचार तसेच मराठीचा मुद्दा अशा विविध विषयांवर देखावे साकारून सामाजिक संदेश दिला आहे.
सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
गणेशोत्सावामध्ये सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नीट पेपर फुटीवर देखावा सादर केला. तसेच शेतकरी आत्महत्येचाही विषय देखाव्यात मांडण्यात आला आहे, असे माउली थोरवे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.