पालिकेचा घरगल्ली स्वच्छतेवर भर
बी विभागात संस्थांकडून अर्ज मागवले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मुंबईतील चाळी आणि इमारतींच्या परिसरातील स्वच्छता अधिक प्रभावी करण्यासाठी महापालिकेने विशेष पावले उचलली आहेत. याअंतर्गत महापालिकेच्या बी विभागातील सामाईक घरगल्ली स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येत असून, या कामासाठी अनुभवी इच्छुक संस्थांकडून स्वारस्य अभिव्यक्ती अर्ज मागवण्यात आले आहेत.
दक्षिण मुंबईतील जुन्या इमारती एकमेकांना अगदी चिकटून असल्याने त्यांच्यामधील अरुंद व निमुळत्या गल्ल्यांची स्वच्छता करणे हे मोठे आव्हान ठरते. अशा निमुळत्या गल्ल्यांमध्ये वाहने जाणे अत्यंत कठीण किंवा अशक्य असते. त्यामुळे या गल्ल्यांची मॅन्युअल (हाताने) सफाई करणे अत्यंत आवश्यक आहे. घरगल्ल्या स्वच्छ ठेवण्याच्या या महत्त्वाचा विचार करून पालिकेने ही निविदा काढली असून, याद्वारे या निमुळत्या आणि कठीण भागांचीही नियमित स्वच्छता केली जाणार आहे.
या योजनेअंतर्गत सामाईक घरगल्ल्यांची स्वच्छता करणे आणि त्यास संलग्न असलेल्या चाळी व इमारतींमधील कचरा संकलित करून परिसर स्वच्छ ठेवणे या कामाचा समावेश आहे. यामुळे बी विभागातील गल्लीबोळांतील स्वच्छता व्यवस्था अधिक बळकट होणार आहे. घरगल्ली स्वच्छतेचे काम प्रभावीपणे पार पाडण्यासाठी अर्जदार संस्थांना बी विभागातील सामाईक घरगल्ली स्वच्छतेचा पूर्वअनुभव असणे आवश्यक आहे.
इच्छुक संस्थांनी भरलेले अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख २४ सप्टेंबर २०२६ पर्यंत आहे. परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी पालिकेने हा उपक्रम हाती घेतला असून, पात्र संस्थांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालिकेच्या ‘बी’ विभागाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.