सरकारच्या विनंतीमुळे
मुंबईतील आंदोलन स्थगित
जरांगेंच्या वतीने उच्च न्यायालयात माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : राज्य सरकारने केलेल्या विनंतीमुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आंदोलन स्थगित केल्याची माहिती जरांगे यांच्या वकिलांनी गुरुवारी (ता.१७) उच्च न्यायालयात दिली. त्यावर प्रस्तावित आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. हे आंदोलन आझाद मैदान येथे येत्या शनिवारपासून होणार होते.
जरांगे यांचे आझाद मैदानावर होणारे आंदोलन रोखण्याचे किंवा खारघर येथे आंदोलन करण्याचे आदेश देण्याच्या मागणीसाठी ॲमी फाउंडेशनने जनहित याचिका केली होती. त्यावर मुख्य न्या. महेश चंद्र त्रिपाठी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. जरांगे यांचे मुंबईतील आंदोलन तूर्तास स्थगित केल्याची माहिती महाधिवक्ता मिलिंद साठ्ये यांनी न्यायालयाला दिली. त्यावर जरांगे यांनी राज्य सरकारच्या विनंतीनंतर आंदोलन तीन महिन्यांसाठी पुढे ढकलल्याचे जरांगे यांचे वकील आशीष गायकवाड यांनी न्यायालयाला सांगितले. जरांगे किंवा त्यांचे समर्थक मुंबईत येणार नाहीत, असे विधान जरांगेंकडून करण्यात यावे आणि ते न्यायालयाने अधिकृतपणे नोंदवून घ्यावे, असे महाधिवक्त्यांनी म्हटले; मात्र तसे विधान करण्यास गायकवाड यांनी नकार दिला.
---
भूमिका स्पष्ट करा!
सरकारने वेळ मागितल्याने जरांगे आझाद मैदान येथे आंदोलनासाठी येणार नाहीत, असे गायकवाड यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने गायकवाड यांना जरांगे यांची भूमिका स्पष्ट करणारे विधान करण्यास किंवा प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच आंदोलनाशी संबंधित आणखी एका याचिकेवरील सुनावणी २४ सप्टेंबरला असल्याचे सांगून तोपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देऊन सुनावणी तहकूब केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.