विद्याविहार हिट अँड रन प्रकरण
मुलांना बिघडण्यापासून रोखणे आवश्यक
उच्च न्यायालयाचे मत; अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्दच
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : विद्याविहार हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्याचा सत्र न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला. हा मुलगा पालकांच्या नियंत्रणाखाली नव्हता. बिघडलेल्या व श्रीमंत मुलांच्या संगतीत राहून वाहनांवर धोकादायक स्टंट करीत होता. अशा प्रकारच्या कृतींना आळा घालण्यासाठी त्याला सुधारगृहात ठेवणे आवश्यक आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
आरोपीच्या पालकांना त्याच्या कृत्यांची माहिती असूनही त्यांनी त्याला रोखले नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले. त्याच्या वर्तनामुळे त्याच्यासह इतरांच्या जीवितासही धोका निर्माण झाला. अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. सुधारगृहात राहिल्याने त्याला आपल्या कृत्याचे गांभीर्य समजण्यास मदत होईल, असे न्या. शिवकुमार डिगे यांच्या एकलपीठाने स्पष्ट केले.
५ फेब्रुवारीला घटना घडली, त्या वेळी आरोपीचे वय १७ वर्षे आठ महिने होते. त्याने निष्काळजीने वाहन चालवून ध्रुमिल प्रेमजी पटेल यांच्या दुचाकीला धडक दिली. उपचारादरम्यान ध्रुमिल यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी मीनल पटेल पूर्णपणे अर्धांगवायूग्रस्त झाल्या. आरोपी १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच दुचाकी व चारचाकी वाहने चालवत होता. तसेच तो वाहने अत्यंत धोकादायक पद्धतीने चालवून स्टंटच्या चित्रफिती तयार करीत असल्याचे सत्र न्यायालयाच्या नोंदीत नमूद आहे. त्याच्या कुटुंबाने प्रकरण मिटवण्यासाठी पीडितांना रक्कम देऊ केल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.