मुंबई

म्हाडाच्या अंबरनाथ, कल्याण परिसरातील ९५० घरांचे काम सुरू

CD

म्हाडाच्या अंबरनाथ, कल्याण
परिसरातील ९५० घरांचे काम सुरू

४५० घरे मंजुरीच्या प्रक्रियेत; तीन वर्षांत सर्व घरे तयार होणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांचे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून जोरदार तयारी सुरू आहे. त्यानुसार मुंबई वगळता एमएमआर क्षेत्रात अंबरनाथ, कल्याण परिसरात पीएमएवाय २.० अंतर्गत १,४०० घरे उभारली जाणार आहेत. त्यापैकी सुमारे ९५० घरांचे प्रत्यक्ष काम सुरू असून उर्वरित ४५० घरे वेगवेगळ्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. पुढील तीन वर्षांत सर्व घरांचे काम पूर्ण केले जाणार आहे.
अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांकडून प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांना पसंती दिली जात आहे. त्याची दखल घेत कोकण मंडळाकडून अंबरनाथनजीक कोचकुंटवली येथे ६०० घरांचे काम सुरू केले आहे. शिवगंगानगर ३५० घरांचे नियोजन असून त्याच्या आराखड्याला मंजुरीची प्रतीक्षा सुरू आहे. मोरीवली येथे १०२ घरे उभारली जाणार असून त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. तर, कल्याणनजीक घोटेघर येथे ३४८ घरांचे काम सुरू आहे. ही घरे पुढील तीन वर्षांत पूर्ण करून विक्री करण्याचे म्हाडाचे नियोजन असल्याचे कोकण मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
३२० चौरस फूट क्षेत्रफळ, २०-२२ लाख रुपये किंमत
म्हाडाकडून पीएमवायअंतर्गत उभारली जाणारी सर्व घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहेत. ३२० चौरस फूट चटई क्षेत्रफळ असलेल्या या घरांची किंमत २०-२२ लाखांच्या घरात असणार आहे. संबंधित उत्पन्न गटातील नागरिकांना अनेकदा कर्ज मिळवताना अडचणी येतात. त्यासाठी म्हाडा वेगवेगळ्या बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

Banjara ST reservation protest: येलदरी जलाशयात बंजारा समाजाचे जलसमाधी आंदोलन; विनोद आडे यांच्या आमरण उपोषणाला व्यापक पाठिंबा

Manwat Health Services Review: सुट्टीच्या दिवशी आरोग्य सुविधांची तपासणी; महालक्ष्मी सणात महिला कर्मचाऱ्यांची ड्युटीमुळे तारांबळ

SCROLL FOR NEXT