मुंबई

आयफोनच्या खरेदीसाठी मुंबईत रांगा

CD

आयफोनच्या खरेदीसाठी मुंबईत रांगा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : ॲपलच्या २०२६ फॉल लाइनअपमधील ज्या नवीन उत्पादनांची लोक खूप दिवसांपासून उत्सुकतेने वाट पाहत होते, त्यांची विक्री सुरू झाली आहे. स्मार्टफोनच्या नव्या मॉडेलच्या खरेदीसाठी ग्राहकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. ॲपलच्या आयफोन १८ प्रो आणि आयफोन १८ प्रो मॅक्सच्या विक्रीला सुरुवात होताच मुंबईत बीकेसी येथील ॲपल स्टोअर्सबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
नवीन आयफोन पहिल्याच दिवशी हातात घेण्यासाठी अनेक जण तासन्‌तास रांगेत उभे होते. ॲपलने भारतातील आपल्या प्रत्यक्ष दुकानांमध्ये सकाळी ८ वाजता विक्री सुरू केली; मात्र विक्री सुरू होण्याच्या अनेक तास आधीच ग्राहक दुकानाबाहेर दाखल झाले होते. एका ग्राहकाने सांगितले, की तो आयफोन ७ पासून सातत्याने नवीन आयफोन खरेदी करीत आहे. यंदाही तो पहाटे ५ वाजता ॲपल स्टोअरबाहेर पोहोचला. मोठी रांग असूनही त्याचा उत्साह कायम होता. ‘आयफोन लॉन्च म्हणजे माझ्यासाठी सणासारखा आहे,’ अशी भावना त्याने व्यक्त केली. दिल्ली आणि हरियानातूनही काही ग्राहक केवळ आयफोन खरेदीसाठी मुंबईत आल्याचे त्याने सांगितले. मुंबईतील आणखी एका ग्राहकाने पहिला आयफोन मिळविण्यासाठी सुमारे १० ते १२ तास प्रतीक्षा केल्याचे सांगितले. अखेर पहिला फोन हातात मिळाल्यानंतर आनंद झाल्याचे त्याने नमूद केले. गेल्या तीन वर्षांपासून आपण आयफोन वापरत असल्याचेही त्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : विमान हवेत असताना दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latur Crop Loss: निलंगा तालुक्यात खरीप पीक शंभर टक्के उद्ध्वस्त; कृषी विभागाच्या ‘७० टक्के’ अहवालावर शेतकऱ्यांचा संताप

Sahyadri Sugar Mill: सह्याद्री साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; घोषणाबाजी, गदारोळ आणि तणावपूर्ण वातावरण

Malegaon Tractor Attack Case: माळेगावात ट्रॅक्टरने जीवे मारण्याचा प्रयत्न; नरूटे कुटुंबीयांवर हल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

SCROLL FOR NEXT