मुंबई

देवनार पशुवधगृहातील सेवा शुल्कात मोठी वाढ; •वधशुल्कात १५० टक्क्यांपर्यंत वाढ प्रस्तावीत

CD

देवनार पशुवधगृहातील
सेवा शुल्कात मोठी वाढ
वध शुल्कात १५० टक्क्यांपर्यंत वाढ प्रस्तावित
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १९ : महापालिकेच्या देवनार पशुवधगृहाच्या आधुनिकीकरणाचा भाग म्हणून आणि वाढता परिचालन खर्च (ऑपरेशनल कॉस्ट) भरून काढण्यासाठी महापालिकेने स्थायी समितीच्या अखत्यारितील सेवा शुल्क सूची भाग-२मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्तांनी यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर केला आहे. या नव्या प्रस्तावानुसार महापालिकेच्या कामगारांमार्फत केल्या जाणाऱ्या पशुवध शुल्कात ५० टक्क्यांपासून ते १५० टक्क्यांपर्यंत भरीव वाढ सुचवण्यात आली आहे.
​देवनार पशुवधगृहाच्या पीपीपी तत्त्वावरील आधुनिकीकरण प्रकल्पांतर्गत जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक सेवा, यंत्रसामग्री, ऑटोमेशन आणि निर्जंतुक पद्धतीचा वापर केला जाणार आहे. याशिवाय ईस्ट दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या धर्तीवर आणि कामगारांच्या मजुरीचा समावेश करून नवीन दर निश्चित करण्यात आले आहेत. ​महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) कायदा २०१५ अंतर्गत गोवंश हत्येवर पूर्ण बंदी असल्याने महापालिकेने या शुल्क सूचीमधून बैलांचे प्रवेश शुल्क, गोठा आकार आणि बैल वध शुल्क पूर्णपणे वगळण्याचा निर्णय घेतला आहे. ​दरम्यान, अनुज्ञापत्रधारकांच्या (लायसन्सधारक) स्वतःच्या कामगारांमार्फत केला जाणारा पशुवध, शीत/अतिशीत मांस चाचणी प्रयोगशाळा शुल्क आणि मांसवाहिनी परिवहन शुल्कात कोणतीही वाढ करण्यात आली नाही.

प्रस्तावित दरवाढ
प्रस्तावित दरवाढीनुसार, म्हैस किंवा पाड्याच्या वध शुल्कात १७७ टक्क्यांची वाढ सुचवण्यात आली असून, सध्याचा १८० रुपयांचा दर आता ५०० रुपये होणार आहे. शेळ्या आणि मेंढ्यांच्या स्थानिक वध शुल्कात १५० टक्क्यांची वाढ प्रस्तावित असून, हा दर ४८ रुपयांवरून थेट १२० रुपयांवर पोहोचणार आहे. वराहाच्या वध शुल्कात १५६ टक्क्यांची वाढ होऊन ते ७८ रुपयांवरून २०० रुपये, तर वराहाच्या पिल्लासाठीचे शुल्क १५० टक्क्यांनी वाढवून ४८ रुपयांवरून १२० रुपये करण्यात येणार आहे. याशिवाय शेळ्या-मेंढ्यांच्या झटका/न्यू पद्धतीच्या वधासाठी सध्या आकारले जाणारे ६० रुपये शुल्क ११६ टक्क्यांनी वाढवून १३० रुपये करण्याचा प्रस्ताव आहे.
......

सुधारित सेवा शुल्क दराचा तक्ता (स्थानिक व निर्यातीसाठी)

पशूचा प्रकार / सेवा सध्याचा दर (रु.)/प्रस्तावीत नवीन दर (रु.)/वाढ (टक्के)

म्हैस किंवा पाडा/रु. १८०/- रु. ५००/- १७७ टक्के
शेळ्या-मेंढ्या (स्थानिक वध)/रु. ४८/- रु. १२०/- १५० टक्के
वराह (स्थानिक वध)/रु. ७८/- रु. २००/- १५६ टक्के
वराहाचे पिल्लू/रु. ४८/- रु. १२०/- १५० टक्के
शेळ्या-मेंढ्या (झटका/न्यू)/रु. ६०/- रु. १३०/- ११६ टक्के
...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: ससूनमधून परतले, जेवणासाठी महामार्गावर उतरले; काही क्षणांतच सहाय्यक फौजदारावर काळाचा घाला, अज्ञात वाहनाची धडक अन्..

Latest Marathi News Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल

मामा-भाच्यात असं काय घडलं? राजगुरूनगरमध्ये धक्कादायक घटना |

Rohit Sharma: वडापाव नाही, तर टेन्शनच्या वेळी आईच्या हातचा 'हा' पदार्थ आहे कम्फर्ट फूड; रोहितने केला खुलासा

Satara Accident News: ४६ दिवस मृत्यूशी झुंज; बंगळूर महामार्गावरील अपघातात गंभीर जखमी प्रतीक काळभोरचा अखेर मृत्यू, एकुलता एक मुलगा गमावला

SCROLL FOR NEXT