मुंबई

विशेष मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमासाठी १०.८० कोटींचा खर्च;

CD

विशेष मतदार यादी पुनरीक्षण
कार्यक्रमासाठी १०.८० कोटींचा खर्च
ई-निविदा प्रक्रिया डावलून डाटा एन्ट्री ऑपरेटरची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १९ : भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासाठी’ (एसआयआर) मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील ३६ विधानसभा मतदारसंघांत डाटा एन्ट्री ऑपरेटर तैनात करण्यात आले आहेत. या चार महिन्यांच्या कामासाठी १० कोटी ८० लाख ९३ हजार ६८० रुपयांचा खर्च अपेक्षित असून, कामाची तातडी लक्षात घेऊन वृत्तपत्रांत ई-निविदा न काढताच कंत्राटदार संस्था व वैयक्तिक स्तरावर थेट ऑपरेटर नियुक्त करण्यात आले आहेत. या प्रक्रियेला मुंबई स्थायी समितीची कार्योत्तर मंजुरी मिळण्यासाठी पालिका आयुक्तांनी प्रस्ताव सादर केला आहे.
​राज्यभरात २० जून २०२६ पासून विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या अभियानांतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) घरोघरी जाऊन गणना प्रपत्रांचे वितरण करणे, भरलेली प्रपत्रे गोळा करणे आणि त्यांचे स्कॅनिंग व डिजिटायझेशन करणे ही कामे मुदतीत पूर्ण करणे आवश्यक होते. यासाठी मुंबई शहर व उपनगरातील सर्व ३६ मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयांमध्ये प्रति महिना प्रति ऑपरेटर २८,५२० रुपये या दराने जास्तीत जास्त ४० ऑपरेटर चार महिन्यांसाठी नियुक्त करण्याचे निश्चित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘प्रश्न विचारणं हा विद्यार्थ्यांचा स्वभाव’; ‘छात्रों की गूंज’मधून राहुल गांधींचं पुन्हा सरकारवर टीकास्र, नेमकं काय म्हणाले?

Muslim Family: दहा वर्षांपासून मुस्लिम कुटुंबाच्या घरी गौरीचा जागर; लोहाऱ्यात धार्मिक सलोख्याची अनोखी परंपरा

दीपिका-रणवीरने केली दुसऱ्या बाळाच्या जन्माची घोषणा, 'दुआ' बनली मोठी बहीण; पाहा पोस्टमध्ये काय लिहिलंय

Latest Marathi News Update : नागपुरातील इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलाला डॉ. हेडगेवारांचं नाव

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांकडून २५०० पानी चार्जशीट दाखल

SCROLL FOR NEXT