मुंबई

१४ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या झोपड्या पालिकेच्या रडारवर •स्वतः पाडा नाहीतर पालिकेची कुऱ्हाड

CD

उंच झोपड्या महापालिकेच्या रडारवर
१ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबरदरम्यान मुंबईभर चालणार विशेष मोहीम

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १९ : मुंबई शहर आणि उपनगर भागातील झोपडपट्ट्यांमध्ये वाढत चाललेल्या अनधिकृत बांधकामांना चाप लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. येत्या १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेकडून विशेष मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत १४ फूट किंवा त्यापेक्षा अधिक उंचीच्या अनधिकृत झोपड्यांवर थेट निष्कासनाची (हातोडा) कारवाई केली जाणार आहे.
​​महापालिका प्रशासनाने केलेल्या पाहणीनुसार, मुंबईत एकूण दोन लाख २३ हजार १५० झोपड्यांची नोंद आहे. त्यापैकी ३९ हजार १११ झोपड्या १४ फूट किंवा त्याहून अधिक उंचीच्या आढळल्या आहेत. त्यानुसार ​पूर्व उपनगरे ३१ हजार २२७ झोपड्या (सर्वाधिक कारवाई पूर्व उपनगरांत प्रस्तावित), ​पश्चिम उपनगरे परिसरात चार हजार ५३६ झोपड्या आणि ​शहर विभागात तीन हजार ३४८ झोपड्या असल्याचे समोर आले आहे.

​या मोहिमेची पूर्वतयारी म्हणून पालिकेने आधीच कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. चार हजार ५८४ अनधिकृत झोपड्यांवर आतापर्यंत निष्कासनाची कारवाई पूर्ण झाली आहे. ६११ झोपड्यांना निष्कासनासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. ​तसेच, २४ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या तीन आठवड्यांच्या कालावधीत वॉर्ड स्तरावर १२८ अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली असून, १४० बांधकामांवर कारवाई नियोजित आहे.

​वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम
​महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या थेट निर्देशांनुसार ही विशेष मोहीम आखण्यात आली आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांच्या मार्गदर्शनात आणि सह आयुक्त (दक्षता) देवेंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये (वॉर्ड्स) ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

कठोर कायदेशीर कारवाई
‘झोपडपट्टी क्षेत्रातील रहिवाशांनी १४ फुटांपेक्षा जास्त उंचीची किंवा इतर कोणतीही अनधिकृत बांधकामे स्वतःहून तत्काळ हटवून घ्यावीत. मुदतीत बांधकामे न हटवल्यास महापालिकेच्या पथकाकडून ती निष्कासित केली जातील आणि होणाऱ्या खर्चासह कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल,’ असा इशारा पालिकेने दिला आहे.
........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime: नागपुरात मकोका आरोपीचा रुग्णालयातून पलायन; मेडिकल कॉलेजच्या शौचालयाची खिडकी तोडून फरार

Latest Marathi News Update : ८ महिन्यांची चिमुकली अचानक बेपत्ता; संशयित आरोपीनं संपवलं जीवन

iPhone युजर्ससाठी WhatsAppचे खास गिफ्ट; मेसेज अन् चॅनेल अपडेट्स शोधणे होणार सोपे! पाहा नवे 'सर्च' फीचर...

Gangapur Crime: गंगापुरात वृद्ध शेतकऱ्याची दीड लाखांची रोख रक्कम लंपास; बँकेसमोरून हेल्मेटधारी चोरट्यांचा थरार

'सिस्टमला विद्यार्थी नको, अंधभक्त हवेत'; ‘छात्रों की गूंज’मधून राहुल गांधींचं सरकारवर टीकास्र, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT