मुंबई

दादरच्या ऐतिहासिक उद्यान गणेश मंदिराला पालिकेची नोटीस; अनधिकृत शेडवर हातोडा पडण्याची शक्यता

CD

दादरच्या ऐतिहासिक उद्यान गणेश मंदिराला पालिकेची नोटीस
​सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध ‘उद्यान गणेश मंदिर’ला महापालिकेने नोटीस बजावली आहे. मंदिराच्या आवारात बांबूचे शेड उभारून अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका पालिकेने ठेवला असून, हे तात्पुरते शेड त्वरित हटवण्याचे निर्देश मंदिर ट्रस्टला दिले आहेत.
महापालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभागाने ही कारवाई सुरू केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ​शिवाजी पार्क परिसराची ओळख असलेल्या उद्यान गणेश मंदिरात गणेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. उत्सवादरम्यान भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने आवारात बांबूचे शेड उभारले होते. मात्र, पालिकेची पूर्वपरवानगी न घेताच हे अतिरिक्त बांधकाम करण्यात आल्याचे तपासणीत समोर आले. यानंतर महापालिकेच्या ‘जी-उत्तर’ वॉर्डने मंदिर ट्रस्टला थेट नोटीस पाठवली आहे. ट्रस्टने स्वतःहून हे अनधिकृत शेड न हटवल्यास पालिकेकडून लवकरच तोडक कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
शिवाजी पार्क मैदानाच्या एका कोपऱ्यात वसलेल्या या मंदिराला मोठा ऐतिहासिक संदर्भ आहे. १९६६ मध्ये या परिसरातील उद्यानात एका व्यक्तीला गणपतीची एक लहान मूर्ती सापडली होती. उद्यानात मूर्ती सापडल्यामुळे भाविकांनी या गणरायाचे नामकरण ‘उद्यान गणेश’ असे केले. पुढे १९७० मध्ये येथे शास्त्रोक्त पद्धतीने मंदिराची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून आजतागायत स्थानिक रहिवासी, क्रीडापटू आणि राजकीय नेत्यांचे हे मंदिर अत्यंत श्रद्धेचे ठिकाण मानले जाते. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या धामधुमीतच पालिकेने ही नोटीस बजावल्यामुळे गणेशभक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आता मंदिर ट्रस्ट या नोटिसीला काय उत्तर देते आणि पालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
.............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांकडून २५०० पानी चार्जशीट दाखल

मोहसिन नक्वींच्या हातून नाकारलेले Asia Cup मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर येणारच, पण...; BCCI सचिवांनी स्पष्टच सांगितलं

Paithan Farmer: खरीप पिके करपली, कर्जाचा ताण वाढला; पैठण तालुक्यात ५२ वर्षीय शेतकऱ्याने संपवलं जीवन

Pune District News: वसतिगृहातून तीन अल्पवयीन विद्यार्थी गायब; १८ दिवस उलटूनही ठावठिकाणा नाही, जुन्नर पोलिसांकडून शोध सुरू

Pune FDA Action: पुण्यात FDAची कारवाई, भूम-वाशीतील खवा-पेढा विक्रेते रस्त्यावर; आमदार तानाजी सावंतांकडून प्रश्नाची दखल

SCROLL FOR NEXT