मुंबई

गणेशोत्सवात महिलांचा मोठा सहभाग

CD

गणेशोत्सवात महिलांचा मोठा सहभाग
ढोल-ताशांपासून आरोग्य सुविधेपर्यंत महिलांची धुरा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ ः मुंबईतील गणेशोत्सवात यंदा महिलांचा सहभाग केवळ भक्ती आणि पूजाविधीपुरता मर्यादित न राहता उत्सवाच्या नियोजनापासून व्यवस्थापनापर्यंत वाढताना दिसत आहे. महिला गणेश मंडळे, महिला ढोल-ताशा पथके, आरोग्यसेवा पथके, प्रसादवाटप आणि गर्दी व्यवस्थापन अशा विविध जबाबदाऱ्या महिला समर्थपणे सांभाळत आहेत. उत्सवात महिलांचा सहभाग वाढल्याचे दिसून येत आहे.
पारंपरिकरित्या पुरुषांचे वर्चस्व असलेल्या वादन क्षेत्रात महिला मोठ्या संख्येने सहभागी होत असून, विसर्जन मिरवणुकांमध्येही महिला पथकांचा सहभाग वाढला आहे. गणेश मंडपांमध्ये भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महिला डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय स्वयंसेवक आणि प्राथमिक उपचार पथकांमध्ये काम करणाऱ्या महिलांचा सहभाग वाढत आहे. गर्दीच्या ठिकाणी महिला भाविकांना मदत करणे, हरवलेल्या व्यक्तींना शोधणे, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र मदत कक्ष चालवणे, तसेच सुरक्षा स्वयंसेवक म्हणून जबाबदारी पार पाडणे, अशी कामेही महिला करीत आहेत.

महिला मंडळांकडून सामाजिक उपक्रम
गणेशोत्सवाच्या माध्यमातून महिला मंडळांकडून आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान, जनजागृती, स्वच्छता, महिला सुरक्षाविषयक उपक्रम आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव यांसारखे उपक्रम राबविले जात आहेत.

उत्सवाच्या केंद्रस्थानी
‘उत्सवाच्या पडद्यामागे नव्हे, तर केंद्रस्थानी महिलांची भूमिका अधोरेखित झाली आहे. भक्तीबरोबर नेतृत्वाचीही जबाबदारी महिला स्वीकारत असल्याने गणेशोत्सवात महिला शक्तीचा जागर या उत्सवात दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘प्रश्न विचारणं हा विद्यार्थ्यांचा स्वभाव’; ‘छात्रों की गूंज’मधून राहुल गांधींचं पुन्हा सरकारवर टीकास्र, नेमकं काय म्हणाले?

Muslim Family: दहा वर्षांपासून मुस्लिम कुटुंबाच्या घरी गौरीचा जागर; लोहाऱ्यात धार्मिक सलोख्याची अनोखी परंपरा

दीपिका-रणवीरने केली दुसऱ्या बाळाच्या जन्माची घोषणा, 'दुआ' बनली मोठी बहीण; पाहा पोस्टमध्ये काय लिहिलंय

Latest Marathi News Update : नागपुरातील इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलाला डॉ. हेडगेवारांचं नाव

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांकडून २५०० पानी चार्जशीट दाखल

SCROLL FOR NEXT