विसर्जन मार्गावर अवजड वाहनांना बंदी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ ः गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध लागू केले आहेत. घाटकोपर वाहतूक विभागाच्या हद्दीतील जेएलआर रोडवरील (उत्तर वाहिनी व दक्षिण वाहिनी) गणेशमूर्ती विसर्जनाच्या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. गणेशोत्सवातील गर्दीच्या काळात विसर्जनासाठी जाणाऱ्या वाहनांना तसेच भाविकांना वाहतूक सुरळीतपणे उपलब्ध व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
वाहतूक पोलिसांच्या आदेशानुसार अनंत चतुर्दशीच्या कालावधीत अवजड वाहनांना संबंधित मार्गावर प्रवेश करता येणार नाही. निर्बंधांच्या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी दिल्या आहेत.
पर्यायी मार्ग म्हणून पूर्व द्रुतगती महामार्गाकडून जेएलआरमार्गे येणाऱ्या अवजड वाहनांनी पूर्व द्रुतगती मार्गाचा वापर करून पुढे जावे. तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गाकडून जेएलआरमार्गे येणाऱ्या अवजड वाहनांनी पश्चिम द्रुतगती महामार्गाचा वापर करावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
===
अवजड वाहन प्रवेशबंदी
गणेशमूर्ती विसर्जनाच्या अनुषंगाने जेव्हीएलआर रोडवर दोन्ही वाहिन्यांवर (उत्तर वाहिनी व दक्षिण वाहिनी) खालीलप्रमाणे अवजड वाहनांना आवश्यकतेनुसार प्रवेशबंदी करण्यात येत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० पासून २६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत ही बंदी लागू असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.