मुंबई

काळाचौकीत गणेशोत्सवाला गालबाेट

CD

काळाचौकीत गणेशोत्सवाला गालबाेट

विजेच्या धक्क्याने दाेन ठार, चार जखमी

​सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : काळाचौकी येथील महागणपती उत्सव मंडळाच्या प्रवेशद्वाराजवळील पिण्याच्या पाण्याच्या स्टॉलवर विजेचा धक्का लागून एका आठ वर्षांच्या मुलीसह महिलेचा मृत्यू झाला. रागिणी घनश्याम यादव (वय ८) आणि सुजाता (३३) अशी मृतांची नावे आहेत. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले आहेत. रविवारी पहाटे २.४५ वाजता ही घटना घडली. जखमींपैकी १२ वर्षांच्या मुलीची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

दुर्घटनेत जखमी झालेल्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रागिणी हिला मसिना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले, तर किरण अकबर नाईक (१९), तन्वी नरेश हांडे (१९) आणि साहिल संदीप तरे (१९) यांची प्रकृती स्थिर आहे. सुजाता (वय ३३) या महिलेला ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. रुही सिंग या बालिकेची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
​काळाचौकीतील दत्ताराम लाड मार्गावरील दिग्विजय मिल चाळीजवळ मंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ पिण्याच्या पाण्याचा स्टॉल उभारण्यात आला होता. या स्टॉलमध्ये अचानक वीजप्रवाह उतरून काही भाविकांना विजेचा धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच पालिकेचे अग्निशमन दल आणि ‘बेस्ट’चे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने परिसर तातडीने रिकामा करून वीजपुरवठा खंडित केला.
----
वायरिंगमध्ये दाेष?
‘बेस्ट’च्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत उत्सवाच्या रोषणाईसाठी व स्टॉलसाठी उभारलेल्या तात्पुरत्या मीटरमधील वायरिंग स्थानिक वायरमनने आधीच तोडल्याचे आढळले. ​याप्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि बेस्टचे मीटर निरीक्षक तपास करत असून, स्टॉलमध्ये वीजप्रवाह कशामुळे उतरला याचा अधिक शोध घेतला जात आहे.
...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : इडुक्की येथे भूस्खलनामुळे दोन जणांचा मृत्यू

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT