मुंबई

काेस्टल राेडवर ‘बीएमडब्ल्यू’ काेसळून तिघांचा मृत्यू

CD

काेस्टल राेडवर ‘बीएमडब्ल्यू’
काेसळून तिघांचा मृत्यू
अतिवेग ठरला जीवघेणा; एकाची प्रकृती चिंताजनक

​सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : कोस्टल रोडच्या उड्डाणपुलावर अनियंत्रित झालेली भरधाव बीएमडब्ल्यू कार रविवारी (ता. २०) पहाटे दुभाजकाला धडकून ७५ फुटांवरून काेसळली. या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. शनाय गज्जल (वय २१), आदित्य जकसानिया (१९) आणि धैर्य सेठ (१७) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मरीन ड्राइव्हहून हाजी अलीच्या दिशेने ही कार जात हाेती. पहाटे ५.२०च्या सुमारास लाला लजपतराय कॉलेजसमोर लोटस जेट्टीजवळ या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून हा भीषण अपघात झाला. शनाय, आदित्य आणि धैर्य यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आल्याचे नायर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. आदित्य ओसवाल (वय २३) या तरुणाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. हे चाैघेही विद्यार्थी असून, शनाय, आदित्य आणि धैर्य हे मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होते. अपघातग्रस्त कार शनाय गज्जल याच्या कुटुंबाची असल्याचे समजते.

अपघातानंतर कोस्टल रोड नियंत्रण कक्ष, स्थानिक पोलिस, रुग्णवाहिका आणि न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अतिवेगामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या अपघाताचे भीषण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून, न्यायवैद्यक पथकाने घटनास्थळावरून नमुने गोळा केले आहेत. हे विद्यार्थी येथे कशासाठी आले होते, त्यांनी मद्यपान केले होते का, याबाबत नागपाडा पोलिस तपास करत आहेत.
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : इडुक्की येथे भूस्खलनामुळे दोन जणांचा मृत्यू

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT