मुंबई

‘मनी व्ह्यू’ आयपीओ २४ सप्टेंबरला बाजारात

CD

मुंबई, ता. २१ : पर्सनल लोन, सुरक्षित कर्जे, क्रेडिट कार्ड, एफडी, विमा आदी सेवा डिजिटल स्वरूपात देणारी कंपनी ‘मनी व्ह्यू’चा आयपीओ २४ ते २८ सप्टेंबरदरम्यान बाजारात येत आहे.

आयपीओसाठी ३२ ते ३४ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला असून, सुमारे ८०० कोटींच्या या इशूसाठी किमान ४४१ शेअरसाठी व त्यापुढे ४४१ शेअरच्या पटीतच अर्ज करावा लागेल. यातील ५० टक्के वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे. ३५ टक्के शेअर सर्वसामान्य गुंतवणूकदारांना तर १५ टक्के शेअर बिगर संस्थात्मक बड्या गुंतवणूकदारांना मिळतील. ‘आयपीओ’मधून मिळणाऱ्या रकमेपैकी ३२५ कोटींचा वापर भविष्यात ग्राहकांना कर्ज देण्यासाठी केला जाईल, असे सहसंस्थापक आणि सीईओ पुनीत अग्रवाल म्हणाले.

कंपनीतर्फे यूपीआय पेमेंट, डिजिटल सोने, वाहन विमा, सर्वसाधारण विमा आदी सेवादेखील दिल्या जातात. कर्ज देण्यासाठी १६ वित्तसंस्था त्यांच्या भागीदार आहेत. त्यांची सध्याची डिजिटल कर्जांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता २२ हजार ५२० कोटी रुपये आहे. त्यांनी नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात २३ हजार ९८ कोटी रुपये पर्सनल लोन दिले. या वर्षात ६० लाख लोकांनी त्यांच्याकडून कर्ज घेतली आहेत. या वर्षाचा त्यांचा महसूल ३ हजार ३५१ कोटी रुपये तर निव्वळ नफा २४२ कोटी रुपये होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC : एमपीएससीच्या मुलाखती पुढे ढकलल्या; पात्र उमेदवारांवर मोठा अन्याय

Traffic Challan: कारमध्ये गाणं वाजवलं तर लागणार मोठा दंड, गाडी जप्तही होऊ शकते; काय आहे नियम?

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

Vishwa Shanti Yatra : आंतरिक शांतीतून विश्वशांती; अभूतपूर्व 'विश्व शांती यात्रा २०२६'चे आयोजन

Apple Layoffs: दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कपात; Fitness+ मधील ‘या’ टीमवरही आता गदा

SCROLL FOR NEXT