मुंबई

गणेशोत्सवात साकारली ‘मराठी शाळा’

CD

गणेशोत्सवात साकारली ‘मराठी शाळा’
सांताक्रूझच्या शांतता विकास मंडळाचा उपक्रम; मराठी माध्यमाच्या भवितव्यावर जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर जनजागृती करण्याचे प्रभावी माध्यम ठरू शकतो. सांताक्रूझ येथील शांतता विकास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी ‘मराठी शाळा’ ही संकल्पना साकारत मराठी माध्यमाच्या शाळांचे महत्त्व, त्यांच्यासमोरील सद्यःस्थिती आणि भविष्यातील आव्हाने याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
मंडळाने उभारलेल्या देखाव्यात प्रवेशद्वारापासूनच मराठी शाळेचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. मुंबईतील जवळपास ३०० हून अधिक मराठी माध्यमाच्या शाळा बंद झाल्या आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम, वार्षिक स्नेहसंमेलन तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांची छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत.
मुख्य देखाव्यात मराठी शाळेची प्रतिकृती साकारताना फळा, सुविचार, वर्गखोल्या, संगणक वर्ग तसेच मुख्याध्यापकांचे कार्यालय यांसारख्या बारकाव्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश केल्याचा अनुभव निर्माण होतो. पारंपरिक शाळेचे वातावरण आणि आधुनिक शिक्षणाची साधने यांचा मेळ या देखाव्यातून साधण्यात आला आहे. या संकल्पनेमागील मुख्य उद्देश केवळ मराठी शाळेचे चित्रण करणे नसून, मराठी माध्यमाच्या शाळांची सद्यःस्थिती, अनेक शाळा बंद होण्यामागील विविध कारणे आणि त्या पुन्हा सक्षमपणे कार्यरत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत समाजात विचारमंथन घडवून आणणे हा आहे.
मराठी शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचे माध्यम नसून भाषा, संस्कृती, संस्कार आणि सामाजिक जडणघडणीचे महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये आधुनिक शिक्षणपद्धती, तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत त्यांना सक्षम करण्याची गरज या देखाव्यातून अधोरेखित करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नाला स्पर्श करणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांनी भेट देऊन मराठी शाळांच्या भवितव्याबाबत विचार करावा, तसेच या विषयावर सकारात्मक चर्चा घडून यावी, अशी अपेक्षा शांतता विकास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने व्यक्त केली आहे.

थोर व्यक्तिमत्त्वांचे स्मरण
शाळेच्या प्रवेशद्वारावर मराठी भाषेच्या प्रचार, प्रसार आणि संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या विविध दिग्गज मान्यवरांना स्थान देण्यात आले आहे. त्यातून मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या जतनासाठी योगदान देणाऱ्या थोर व्यक्तिमत्त्वांचे स्मरण करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT