प्रवेशाची ६,६८८ विद्यार्थ्यांना संधी
पाचवर्षीय विधीची तिसरी यादी जाहीर
मुंबई, ता. २१ : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पाचवर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. या तिसऱ्या यादीत उपलब्ध जागांची संख्या सात हजार ९७७ होती. त्यापैकी सहा हजार ६८८ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. तिसऱ्या फेरीसाठी १० हजार ३५३ विद्यार्थ्यांनी पसंती दिली होती.
राज्यात पाचवर्षीय विधी अभ्यासक्रम प्रवेशासाठी १८ हजार ७३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी तिसऱ्या फेरीत १० हजार ३५३ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरले होते. त्यामुळे याच विद्यार्थ्यांचा विचार तिसऱ्या कॅप फेरीच्या यादीसाठी करण्यात आला. तिसऱ्या फेरीच्या वाटपासाठी राज्यात १६५ पाचवर्षीय विधी महाविद्यालयात सात हजार ९७७ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी सहा हजार ६८८ विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीत विविध पसंतीक्रमांच्या महाविद्यालयांत प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे. आजपर्यंत पहिल्या फेरीत २,६८६ आणि दुसऱ्या फेरीत १,४७४ अशा दोन्ही फेऱ्या मिळून एकूण चार हजार १६० विद्यार्थ्यांनी पाचवर्षीय विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. तिसऱ्या फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आता २३ सप्टेंबर २०२६ पर्यंत मिळालेल्या महाविद्यालयात प्रत्यक्ष हजर राहून आवश्यक ती कागदपत्रे सादर करून व शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.