भूमी अभिलेखांच्या अपील प्रकरणांसाठी लोकअदालत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबई उपनगर जिल्ह्यात भूमी अभिलेख विभागाशी संबंधित प्रलंबित अर्धन्यायिक अपील प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले महसूल लोकअदालत अभियान राबविण्यात येणार आहे. महसूल व वन विभागाच्या १४ ऑगस्ट २०२६च्या शासन निर्णयानुसार हे अभियान आयोजित करण्यात आले आहे.
अभियानांतर्गत मुंबई उपनगर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख तसेच विविध नगर भूमापन अधिकारी कार्यालयांशी संबंधित प्रकरणांची सुनावणी घेतली जाणार आहे. अंधेरी तालुक्यातील प्रकरणांसाठी २२ ऑक्टोबर २०२६ला सकाळी ११.३० वाजता जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, प्रशासकीय इमारत, १०वा मजला, वांद्रे (पूर्व) येथे लोकअदालत होईल. कुर्ला तालुक्यातील प्रकरणांसाठी २४ डिसेंबर २०२६ला सकाळी ११.३० वाजता नगर भूमापन अधिकारी, घाटकोपर कार्यालय, टोपीवाला कॉलेज इमारत, मुलुंड (पूर्व) येथे सुनावणी होणार आहे. तर बोरिवली तालुक्यातील प्रकरणांसाठी २५ मार्च २०२७ला सकाळी ११.३० वाजता नगर भूमापन अधिकारी, बोरिवली कार्यालयात लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. परस्पर संमतीने तडजोड होऊ शकणाऱ्या अपील प्रकरणांतील पक्षकारांना ‘प्रपत्र अ’नुसार तडजोडनामा अर्ज साद करता येणार आहे. वाद कमी करणे, वेळ व खर्च वाचवणे आणि नागरिकांना जलद न्याय मिळवून देणे, हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे. संबंधित नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, मुंबई उपनगर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९०८२५६८९५१ या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असेही या वेळी सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.