मुंबई

भेदभावाच्या आराेपांची चाैकशी करा

CD

भेदभावाच्या आराेपांची चाैकशी करा
आयआयटीतील आत्महत्येप्रकरणी काँग्रेस आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी विविध विद्यार्थी संघटना आणि मुंबई युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेऊन आयआयटी मुंबईच्या प्रवेशद्वारासमोर तीव्र आंदोलन केले. साहिल वाकोडेच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. ही कारवाई निष्पक्ष व पारदर्शी करावी आणि जबाबदार असलेले प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. आंदोलनादरम्यान पोलिस आणि आंदोलकांत झटापटही झाली.

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली साेमवारी आयआयटी मुंबई येथे आंदोलन करण्यात आले. या वेळी पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. युवक काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी या वेळी जोरदार घोषणाबाजी करून साहिल वाकोडेला न्याय मिळावा, अशी आग्रही मागणी केली. ‘जब जब सरकार डरती, है पुलिस को आगे करती है’ अशा घोषणाही या वेळी देण्यात आल्या. पोलिसांनी या वेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड करून पोलिस ठाण्यात नेले. या वेळी शबरीन म्हणाल्या की, आत्महत्येप्रकरणी विद्यार्थ्यांनी १८ मागण्या केल्या आहेत. यापूर्वीही या संस्थेत शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे संस्थात्मक उत्तरदायित्व, निर्णयप्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग, मानसिक आरोग्य व समुपदेशनासाठी अधिक भक्कम आधार, तक्रार निवारणाची प्रभावी यंत्रणा या मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. त्या सरकारने तातडीने पूर्ण कराव्यात, असे शबरीन म्हणाल्या. दरम्यान, आंदोलनादरम्यान यापूर्वी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या छायाचित्रांसमोर मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहण्यात आली.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT