‘कोस्टल’वर लवकरच कॅमेऱ्यांचे जाळे
अपघातानंतर प्रशासनाला जाग; ओव्हर स्पीडला ब्रेक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : रविवारच्या भीषण अपघातानंतर मुंबईचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला कोस्टल रोड वाहनांच्या अनियंत्रित वेगामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वेगमर्यादेचे सर्रास होणारे उल्लंघन, लेनची शिस्त न पाळणे आणि ड्रंक अँड ड्राइव्हसारख्या गंभीर समस्यांना वेसण घालण्यासाठी मुंबई पोलिस, वाहतूक पोलिस आणि महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत कोस्टल रोडवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे कॅमेरे बसवून वेगावर डिजिटल पाळत ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
शेकडो कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या या भव्य सागरी मार्गावर दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्हला उत्तर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वरळी, हाजी अली आणि वांद्रे-वरळी सी लिंकशी जोडणाऱ्या रस्त्यावर सद्यःस्थितीत केवळ सात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. मरीन ड्राइव्हकडून वरळीकडे जाताना लागणाऱ्या भुयारी मार्गातील एका लेनवर तीन आणि अमरसन्स इंटरचेंज येथे चार कॅमेरे लावण्यात आले आहेत, मात्र दुसऱ्या लेनवर एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाही. रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला तेव्हा सुरुवातीलाच येथे मोठे कॅमेरा जाळे उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, मात्र तत्कालीन महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केवळ आठ कोटी रुपयांचे बजेट मंजूर केल्याने अत्यंत मोजकेच कॅमेरे बसवता आले.
...
१७०च्या पुढील स्पीडची नोंदच नाही!
सध्या कार्यरत असलेल्या कॅमेऱ्यांची क्षमता अत्यंत मर्यादित आहे. हे कॅमेरे १७० किमी प्रतितासपेक्षा जास्त वेगाने जाणाऱ्या हाय-स्पीड गाड्यांची नोंद घेण्यास असमर्थ ठरत आहेत तसेच यामध्ये अत्याधुनिक ‘स्पीड डिटेक्शन’ आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन यंत्रणा नसल्याने वेगवान वाहनांवर कारवाई करणे वाहतूक पोलिसांना कठीण जात होते.
...
२१ कॅमेऱ्यांचे जाळे
अपघातांचे सत्र रोखण्यासाठी महापालिका आता कोस्टल रोडवर २१ नवीन हाय-रिझोल्युशन आणि उच्च क्षमतेचे तंत्रज्ञान असलेले कॅमेरे बसवणार आहे. यामुळे मार्गावरील एकूण कॅमेऱ्यांची संख्या २८ होईल. या सर्व कॅमेऱ्यांचे थेट नियंत्रण मुंबई वाहतूक पोलिसांच्या कंट्रोल रूमकडे असेल. या अत्याधुनिक कॅमेऱ्यांमुळे अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांची नंबर प्लेट तत्काळ स्कॅन होऊन थेट ऑनलाइन ई-चलान फाडले जाणार आहे. या कठोर पावलांमुळे कोस्टल रोडवरील बेदरकार चालकांना चाप बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.