दुष्काळाचा फटका बसलेल्या मच्छीमारांना मदत मिळणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : राज्याच्या काही भागांत निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मच्छीमारांना दिलासा देण्याची तयारी सुरू केली आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्व तलाव, जलाशय आणि मत्स्यबीज केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
सिंधुदुर्ग येथून मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांची ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीला मत्स्य आयुक्त भानुदास पालवे यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच विभागांना दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन माहिती संकलित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मत्स्य विभागानेही वस्तुनिष्ठ माहिती गोळा करावी, असे मंत्री राणे म्हणाले. प्रत्येक जिल्ह्यातील तलावांची संख्या, सध्याचा जलसाठा, संभाव्य बाधित तलाव आणि तालुक्यांची माहिती तातडीने गोळा करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणीदरम्यान स्थानिक मच्छीमारांशी संवाद साधून त्यांना सरकारकडून मदत मिळणार असल्याचा विश्वास द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
...
दौरा करणार
मंत्री राणे हे स्वतः राज्याच्या विविध भागांचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेणार असून, बाधित मच्छीमारांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत. मत्स्यपालनाला शेतीचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतीच्या नुकसानीसोबतच मत्स्यव्यवसायातील बाधित मच्छीमारांनाही मदत मिळाली पाहिजे, असे सांगत बाधितांची संपूर्ण माहिती संकलित करून जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.