सणांसाठी रेल्वेच्या १६२ विशेष गाड्या
एलटीटीहून बिहार, उत्तर प्रदेशसाठी अतिरिक्त सेवा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आणखी १६२ विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. त्यामुळे उत्सवासाठी जाहीर करण्यात आलेल्या विशेष गाड्यांची संख्या ५८० झाली आहे. मुंबईहून बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालसह राजस्थान व दिल्लीकडे जाणाऱ्या प्रवाशांना या गाड्यांचा लाभ मिळणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)-समस्तीपूर दरम्यान १३ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबरदरम्यान दर मंगळवारी वातानुकूलित विशेष गाडी धावेल. परतीची गाडी १५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबरदरम्यान दर गुरुवारी धावणार आहे. या मार्गावर एकूण १२ सेवा असतील. एलटीटी-दानापूर दरम्यान ९ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबरदरम्यान दररोज विशेष गाडी धावेल. परतीची गाडी १० ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबरदरम्यान दररोज धावणार आहे. या मार्गावर सर्वाधिक ८८ सेवा असतील. एलटीटी-संतरागाछी यादरम्यान ६ ते २७ ऑक्टोबरदरम्यान दर मंगळवारी आणि परतीची गाडी ८ ते २९ ऑक्टोबरदरम्यान दर गुरुवारी धावेल. या मार्गावर आठ सेवा असतील. एलटीटी-बनारस यादरम्यान १८ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरदरम्यान दर रविवारी आणि परतीची गाडी १७ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबरदरम्यान दर शनिवारी धावेल. या मार्गावर १४ सेवा असतील. खडकी-हजरत निजामुद्दीन यादरम्यान ६ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबरदरम्यान दर मंगळवारी आणि शुक्रवारी वातानुकूलित सुपरफास्ट विशेष गाडी धावेल. परतीची गाडी दर बुधवारी आणि शनिवारी धावणार असून, या मार्गावर २८ सेवा असतील. खडकी-सांगानेर यादरम्यान १५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबरदरम्यान दर गुरुवारी आणि परतीची गाडी दर शुक्रवारी धावेल. या मार्गावर १२ सेवा असतील.
...
आरक्षण सुरू
या सहा विशेष गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर करता येईल. अनारक्षित डब्यांचे तिकीट सामान्य दराने यूटीएस प्रणालीद्वारे घेता येईल. प्रवाशांना ‘रेलवन’ ॲपवरूनही तिकीट आरक्षण करता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.