कोकण रेल्वेवर २० दिवसांचा ब्लॉक
काही गाड्या रद्द, दसऱ्यापर्यंत वाहतुकीवर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : कोकण रेल्वे मार्गावर असनोटी आणि कारवार स्थानकांदरम्यान तांत्रिक कामासाठी १ ते २० ऑक्टोबरदरम्यान ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात या मार्गावरील काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावणार आहेत. काही गाड्या मार्गात थांबवून ठेवण्यात येणार असल्याने प्रवाशांच्या प्रवासाच्या वेळेवरही परिणाम होणार आहे.
८ आणि १५ ऑक्टोबरला सुटणारी गाडी क्रमांक ५६६१६ मंगळुरू सेंट्रल-मडगाव जंक्शन एक्स्प्रेस कारवारपर्यंतच धावेल. कारवार ते मडगावदरम्यान ही गाडी रद्द राहणार आहे. त्याच दिवशीची गाडी क्रमांक ५६६१५ मडगाव जंक्शन-मंगळुरू सेंट्रल एक्स्प्रेस मडगावऐवजी कारवार स्थानकातून निर्धारित वेळेत सुटेल. त्यामुळे मडगाव ते कारवारदरम्यान या गाडीची सेवा रद्द राहणार आहे.
मडगावहून गाडी उशिराने
४, ९, ११, १६ आणि १८ ऑक्टोबरला मडगावहून सुटणारी गाडी क्रमांक ५६६१५ सुमारे ९० मिनिटे उशिराने रवाना होईल. तसेच ६, १३ आणि २० ऑक्टोबरला हीच गाडी निर्धारित वेळेपेक्षा १६० मिनिटे म्हणजे दोन तास ४० मिनिटे उशिराने सुटणार आहे.
एक्स्प्रेस गाड्यांना विलंब
७ आणि १४ ऑक्टोबरला सुटणारी गाडी क्रमांक १९०५७ सुरत-मंगळुरू जंक्शन द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस मडगाव ते काणकोणदरम्यान २५ मिनिटे थांबवून ठेवण्यात येईल. २, ९ आणि १६ ऑक्टोबरला धावणारी गाडी क्रमांक २२१४९ एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेस कुंदापूर ते कारवारदरम्यान दोन तास २० मिनिटे थांबवून ठेवण्यात येणार आहे.
पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेसवरही परिणाम
४, ११ आणि १८ ऑक्टोबरला सुटणारी गाडी क्रमांक ११०९७ पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेस मडगाव ते कारवारदरम्यान दोन तास २० मिनिटे थांबवून ठेवण्यात येणार आहे. तांत्रिक कामामुळे होणाऱ्या या बदलांची प्रवाशांनी नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.