मुंबई

सरकारी शाळांसाठी आजपासून बेमुदत धरणे

CD

मुंबई, ता. ४ : सरकारी शाळांचे संरक्षण, शाळा बंद करण्याच्या धोरणाला विरोध आणि शिक्षणाचे खासगीकरण थांबविण्याच्या मागणीसाठी ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच’च्या वतीने उद्या (ता. ५)पासून आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून पालक, विद्यार्थी तसेच सामाजिक संघटनांचे हजारो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती मंचाचे निमंत्रक संपत देसाई, संजय वेतुरेकर आणि सिद्धार्थ जगदेव यांनी दिली.

शिक्षण हक्क कायद्याने प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणाचा अधिकार दिला असून, शाळांमध्ये आवश्यक भौतिक सुविधांचे निकषही निश्चित केले आहेत. शिक्षकनिहाय वर्गखोल्या, मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र कक्ष, स्वच्छ पिण्याचे पाणी, मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालये, खेळाचे मैदान व साहित्य, वाचनालय, सुरक्षा भिंत, धान्य साठवणुकीची स्वतंत्र व्यवस्था तसेच डिजिटल साधने आदी सुविधांचा त्यात समावेश असल्याचे मंचाने म्हटले आहे, मात्र राज्यातील अनेक सरकारी शाळांमध्ये अद्याप पिण्याचे पाणी आणि शौचालयांसारख्या मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे सरकारी शाळांची अवस्था गंभीर झाल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

‘एनईपी’मुळे सरकारी शिक्षण व्यवस्थेवर परिणाम
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे (एनईपी) ग्रामीण तसेच शहरी भागातील सरकारी प्राथमिक, अनुदानित माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा मंचाने केला आहे. मोठ्या प्रमाणात शाळा व महाविद्यालये बंद होण्याची भीती व्यक्त करताना, याचा सर्वाधिक परिणाम दलित, आदिवासी, बहुजन, कष्टकरी, भटके-विमुक्त तसेच मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांवर होऊ शकतो, असे मंचाचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT