मुंबई

हा तर कोल्हेकुई मोर्चा ः आशीष शेलार

CD

हा तर कोल्हेकुई मोर्चा : आशीष शेलार

मुंबई, ता. ४ : निवडणुकीत विजय मिळाला तर ईव्हीएम आणि निवडणूक आयोग योग्य; मात्र पराभव झाला की त्याच निवडणूक आयोगावर आणि ईव्हीएमवर आरोप करायचे, ही विरोधकांची दुटप्पी भूमिका आहे. आजचा मोर्चा हा ‘गर्जना मोर्चा’ नसून ‘कोल्ह्याला द्राक्षे आंबट’ या म्हणीला साजेसा कोल्हेकुई मोर्चा होता, अशा शब्दांत सांस्कृतिक मंत्री ॲड. आशीष शेलार यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
विरोधी पक्षांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली. ज्ञानेशकुमार निवडणूक आयुक्त झाल्यानंतर सहा निवडणुकांचा संदर्भ देत शेलार म्हणाले, की या सहा निवडणुकांपैकी तीन ठिकाणी भाजप किंवा एनडीएला यश मिळाले, तर केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथे गैरभाजप पक्षांची सरकारे सत्तेवर आली. पश्चिम बंगाल, बिहार आणि आसाममध्ये भाजपला यश मिळाले. त्यामुळे निवडणूक आयोग पक्षपाती असल्याचा आरोप करण्यामागे कोणतेही तथ्य नाही. हा तथ्यहीन आणि लबाडीचा आरोप आहे. निवडणुकीतील पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडण्यापेक्षा जनतेचा कौल स्वीकारण्याची गरज आहे, असे शेलार यांनी म्हटले. महाराष्ट्रात विधानसभा फेरनिवड घ्या, असे आज विरोधक म्हणत आहेत. त्यांना हे माहीत नाही का, की ज्ञानेशकुमारांची नियुक्ती होण्याआधीच महाराष्ट्राच्या निवडणूक झाल्या आहेत.
...
एसआयआरमुळे यादी अधिक सुरक्षित
एसआयआरच्या माध्यमातून मतदार यादी अधिक शुद्ध आणि सुरक्षित होणार आहे. ९० टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून, उर्वरित मतदारांचीही पडताळणी केली जात आहे. त्यामुळे एसआयआरबाबत जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम विरोधकांनी करू नये, असे आवाहन शेलार यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT