मुंबई

मतदानाच्या हक्कासाठी एल्गार

CD

मतदानाच्या हक्कासाठी एल्गार
शिवसेना (ठाकरे)-मनसेचा तळपत्या उन्हात मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : तळपत्या उन्हाची पर्वा न करता मतदानाचा हक्क आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मागणीसाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी मुंबईच्या रस्त्यावर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे तरुणांसोबतच महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला.
सकाळपासूनच सीएसएमटीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली होती. हातात पक्षाचे झेंडे, फलक आणि मतदानाच्या हक्काच्या समर्थनार्थ घोषणा देत कार्यकर्ते मोर्चात सहभागी होत होते. उन्हाची तीव्रता वाढत असतानाही मोर्चातील उत्साह मात्र कायम होता. मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा मूलभूत आधार असून, निवडणूक प्रक्रियेवर नागरिकांचा विश्वास कायम राहिला पाहिजे, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि मतदारांच्या हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
...
ज्येष्ठ नागरिकांचाही उत्स्फूर्त सहभाग
या आंदोलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची लक्षणीय उपस्थिती. तळपत्या उन्हातही अनेक महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. ‘मतदानाचा हक्क अबाधित राहिलाच पाहिजे,’ अशा घोषणांनी सीएसएमटी परिसर दणाणून गेला.
...
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सीएसएमटी आणि आसपासच्या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. गर्दीमुळे वाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांनीही विशेष नियोजन केले होते. मोर्चेकऱ्यांच्या हालचालींवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत होते.
...
‘‘गेली ४५ वर्षे ठाकरे कुटुंबीयांशी मी जोडलो आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावायचो. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या कार्यक्रमांना मी उपस्थित असतो. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना रस्त्यावर मला पाहून गाड्यांचा ताफा थांबून भेट घेतली होती,’’ अशी आठवण ज्येष्ठ शिवसैनिक मोहन यादव यांनी सांगितली.
...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मतदानाचा अधिकार दिला आहे; मात्र केंद्र सरकार हा मतदानाचा अधिकार लुबाडण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतीय नागरिकांना सरकार निवडण्यासाठी मतदानाचा अधिकार आहे; मात्र सरकारच आता मतदार निवडत आहे. हुकूमशाहीच्या दृष्टीने वाटचाल सुरू असून, तिला लगाम लागायला हवा.
- प्रदीप वाघमारे, अवजड वाहतूक विभागप्रमुख, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना
...
सरकारने नागरिकांच्या मतदानाच्या अधिकारावर घाला घातला. त्यांचे नाव मतदार यादीतून गायब केले. त्यामुळे हा आक्रोश होणारच होता. सरकारवरील नाराजीचे आंदोलनात रूपांतर झाले. लोकशाहीत आंदोलन करणे हा आमचा अधिकार आहे. तो सरकार हिरावून घेऊ शकत नाही.
- उज्ज्वला गुरव, ज्येष्ठ नागरिक
...
मतचोरीवर लोकांनी सातत्याने आवाज उठवूनही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. या प्रकारणात दोषी असलेले निवडणूक आयुक्त यांचा केवळ राजीनामा नको, तर त्यांना अटक व्हायला हवी.
- सुभाष येवले, ज्येष्ठ शिवसैनिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT