मुंबई

५०० किलो गांजा जप्त

CD

५०० किलो गांजा जप्त
मुंबई ‘एनसीबी’कडून तिघांना अटक


सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ४ : ओडिशातून महाराष्ट्रात होणाऱ्या आंतरराज्य गांजा तस्करीचा अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) मुंबई पथकाने रविवारी (ता. ४) नागपूरमध्ये पर्दाफाश केला. या कारवाईत ‘एनसीबी’ने जवळपास ५०० किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी ट्रकचालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या गांजाची पुढे जालना आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे तस्करी केली जाणार होती.

‘एनसीबी’ला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रविवारी (ता. ४) पहाटे नागपूरमध्ये पश्चिम बंगाल नोंदणीच्या व्यावसायिक मालवाहू ट्रकचा माग काढण्यात आला. आर. पी. गोल्डर आणि ए. सरकार हे दोघे ट्रकमध्ये असल्याचे आढळले. तपासणी केली असता स्टील पाइपमध्ये लपविलेला ५०० किलो गांजा आढळून आला. हा ट्रक ओडिशातील संबळपूर येथून निघाला होता. तस्करीसाठी नेहमीच्या कमी अंतराच्या मार्गाऐवजी वेगवेगळ्या मार्गांचा वापर करून तपास यंत्रणांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ट्रकचालकांकडून मिळालेल्या माहितीनंतर एनसीबीने नागपूरमधील गांजा स्वीकारणारा एस. ए. एस. युसूफ ऊर्फ राजाभाईला सापळा रचून अटक केली. राजाभाई गेल्या चार-पाच वर्षांपासून अमली पदार्थांच्या तस्करीत सक्रिय असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वीही एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याचे ‘एनसीबी’ने सांगितले. जप्त केलेल्या या गांजाची किमत पाच कोटी असल्याचे सांगण्यात आले. या नेटवर्कमधील अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. दरम्यान, याच वर्षात एनसीबीने नागपूर, गोंदिया आणि भंडारा येथील कारवायांमध्ये अनुक्रमे २०९.८५०, ७०२ आणि २४५ किलो गांजा जप्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

SCROLL FOR NEXT